राधानगरी तालुक्यातील ‘या’ योजनांच्या खर्चावरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली…

मुंबई (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील विशेष ९ विविध योजनांच्या कामांसाठी देण्यात आलेल्या ५८ कोटी रुपयांवर  स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठविण्याचे आदेश आज (गुरुवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले. या बैठकीत राधानगरी तालुक्यातील जलसंधारण आणि जलसंपदा विभागाच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. तसेच आ. प्रकाश आबिटकर यांच्यासह जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव… Continue reading राधानगरी तालुक्यातील ‘या’ योजनांच्या खर्चावरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी उठवली…

अभियंत्यांमुळेच विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा विकास : अजितकुमार माने

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या प्रत्येक औद्योगिक क्षेत्रात अभियंता कार्यरत असल्यामुळे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान विकास शक्य झालेला आहे. अभियंत्यांमुळेच देशात विज्ञान आणि तंत्रज्ञानचा मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे, असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजितकुमार माने यांनी केले. अभियंता दिनानिमित्त ते जिल्हा परिषदेत बोलत होते. जि. प. मधील ग्रामीण पाणीपुरवठा आणि बांधकाम विभाग यांच्या वतीने… Continue reading अभियंत्यांमुळेच विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्राचा मोठा विकास : अजितकुमार माने

काँग्रेस कमिटीत रत्नाप्पाण्णा कुंभार यांना अभिवादन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांची ११३ वी जयंती कोल्हापूर जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी साजरी करण्यात आली. प्रथम कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. या कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुलाबराव घोरपडे, किशोर खानविलकर, संजय पवार वाईकर, रंगराव देवणे, हेमलता माने, मतीन शेख, अर्जुन सकटे,… Continue reading काँग्रेस कमिटीत रत्नाप्पाण्णा कुंभार यांना अभिवादन

उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी समन्वय आवश्यक : आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना आ. सतेज पाटील यांनी केल्या आहेत. उद्योजकांच्या विविध समस्या, प्रलंबित प्रश्न यासंदर्भात कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य पातळीवरील समस्यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याच्या… Continue reading उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी समन्वय आवश्यक : आ. सतेज पाटील

वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणी राज्यभर राष्ट्रवादीची निदर्शने

मुंबई/ पुणे (प्रतिनिधी) : वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला पळवल्याचा विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. शिंदे व फडणवीस सरकारच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘५० खोके, महाराष्ट्राला धोके’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आंदोलकांनी आरोप केला की,… Continue reading वेदांत-फॉक्सकॉन प्रकरणी राज्यभर राष्ट्रवादीची निदर्शने

लाल बावटातर्फे योजना संदर्भात जनजागृती मोहीम : कॉ. सुतार

राशिवडे (प्रतिनिधी) : इमारत बांधकाम कामगार कल्याण मंडळातून मिळणाऱ्या योजना समजण्यासाठी लाल बावटातर्फे जनजागृती मोहीम सुरु केली असून, या मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कॉ. संदीप सुतार यांनी केले आहे. ते म्हणाले, लाल बावटा बांधकाम कामगार संघटना सक्रिय असून, या संघटनेच्या माध्यमातून गावोगावी कामाच्या ठिकाणी जाऊन बांधकाम कामगारांना नवीन… Continue reading लाल बावटातर्फे योजना संदर्भात जनजागृती मोहीम : कॉ. सुतार

योजना कोणीही राबवल्या तरी त्यावर शिक्का माझाच : मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : बिळात लपलेले विरोधक सत्ता संघर्षानंतर बाहेर पडलेत. त्यांना माझे विधायक काम पटले आहे.  त्यामुळेच मी सुरू केलेल्या योजना ते राबवित आहेत, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. गोरगरिबांच्या कल्याणाच्या या योजना कोणीही राबवीत असले, तरी त्यावर शिक्का मात्र माझाच आहे, असेही ते म्हणाले. तालुक्यातील कसबा सांगाव येथे बांधकाम  कामगारांना सुरक्षा साहित्य… Continue reading योजना कोणीही राबवल्या तरी त्यावर शिक्का माझाच : मुश्रीफ

‘घरफाळा घोटाळा प्रकरणी संजय भोसले यांना निलंबित करा’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेतील घरफाळा घोटाळयास जबाबदार असलेले माजी कर निर्धारक व अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी आज कोल्हापूर विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली. संजय भोसले यांनी घरफाळा घोटाळा करून महापालिकेचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. भोसले यांच्या विरोधात आजवर अनेक वेळा आंदोलने झाली. अनेक तक्रारी देखील झाल्या आहेत. तरी… Continue reading ‘घरफाळा घोटाळा प्रकरणी संजय भोसले यांना निलंबित करा’

जैन सेवासंघातर्फे महावीर अध्यासनास १.११ लाखाची देणगी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्रास जैनसेवा संघातर्फे भगवान महावीर अध्यासनास १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी देण्यात आली. भगवान महावीर अध्यासनासाठी १३ कोटी रुपये खर्चून भव्य वास्तू उभारली जाणार आहे. यातून जैनधर्माचे शास्त्रीय संशोधन व युवकांना मार्गदर्शन यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कार्य केले जाणार आहे. या कार्यासाठी जैनसेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी… Continue reading जैन सेवासंघातर्फे महावीर अध्यासनास १.११ लाखाची देणगी

रेशनधान्य बंदचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी

कुंभोज (प्रतिनिधी)  : हातकणंगले तालुका रेशनिंग कृती समितीचे अध्यक्ष, कुंभोज ग्रा.पं. सदस्य अजित देवमोरे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना रेशनधान्य बंद करण्याचे परिपत्रक रद्द करावे, या मागणीचे निवेदन दिले आहे. पिवळे व केशरी रेशनकार्डचा लाभ घेणारे सरकारी कर्मचारी, करदाते, खासगी नोकरदार, घरात चारचाकी वाहन व तत्सम सुविधा असणारे, अर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी कुटुंबे शोधून त्यांना पांढऱ्या… Continue reading रेशनधान्य बंदचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी

error: Content is protected !!