डॉ. डी. वाय.पॉलिटेक्निक संघाला बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा विभागीय बॅडमिंटन स्पर्धेत कसबा बावडा येथील डॉ. डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत १६ अभियांत्रिकी पदविका संघ सहभागी झाले होते. तर अंतिम फेरीत झालेल्या सामन्यात डी. वाय.पॉलिटेक्निक संघाने गव्हर्मेंट पॉलिटेक्निक, रत्नागिरी संघावर २-० असा सलग सेटमध्ये विजय मिळवला. या विजयी संघात प्रथमेश मोरे, अथर्व शिंदे, यश पाटील,… Continue reading डॉ. डी. वाय.पॉलिटेक्निक संघाला बॅडमिंटन स्पर्धेत विजेतेपद…

हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस तालीम ही सर्वोत्कृष्ट तालीम बनवणार : ना. अजित पवार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या तालमीचा हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस तालीम ही सर्वोत्कृष्ट तालीम बनवणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच यासाठी सर्वसमावेशक आराखडा सादर करा, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची उपस्थित होते. आज (सोमवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी श्री शाहू विजयी… Continue reading हेरिटेज लुक कायम ठेवून गंगावेस तालीम ही सर्वोत्कृष्ट तालीम बनवणार : ना. अजित पवार

अंपगत्वावर मात करत प्रथमेशची डाक सहाय्यक पदाला गवसणी…

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील सावर्डे तर्फ असंडोली येथील प्रथमेश संभाजी कापडे यांची भारतीय डाक विभागात स्पोर्ट्स कोट्यातून मुंबई विभागात डाक सहाय्यक पदी निवड झाली आहे. त्याने कमी वयातच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅरा जलतरण स्पर्धेतून चॅम्पियनशिप मिळविली. प्रथमेशने गेल्या दहा वर्षात राज्यस्तरीय – २४ सुवर्ण, ४ रजत , १ कास्य, राष्ट्रीयस्तरीय – ७ सुवर्ण, ६… Continue reading अंपगत्वावर मात करत प्रथमेशची डाक सहाय्यक पदाला गवसणी…

शिवाजी स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यास कटिबद्ध : आ. सतेज पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे. या स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार सतेज पाटील यांनी दिले. ते शिवाजी स्टेडियम येथे बोलत होते. आमदार जयश्री जाधव यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समिती मधून शिवाजी स्टेडियम मधील मैदानाचे सपाटीकरण आणि ड्रेनेज लाईनच्याकामासाठी 1 कोटी 94 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.… Continue reading शिवाजी स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यास कटिबद्ध : आ. सतेज पाटील

संजीवनच्या निखील मिसाळ याची ऑल इंडिया स्विमिंग स्पर्धेसाठी निवड…

पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयामधील सिव्हील विभागात शेवटच्या वर्षात शिकणारा विद्यार्थी निखील निलेश मिसाळ याची ऑल इंडिया स्विमिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ऑल इंडिया स्थरावर होणाऱ्या या स्विमिंग स्पर्धा चेन्नई येथे २ ते ४ फेब्रुवारी २०२४ या दरम्यान होणार आहेत. ऑल इंडिया स्विमिंग स्पर्धेमध्ये निखील मिसाळ याची ५०, १०० आणि २०० मीटर… Continue reading संजीवनच्या निखील मिसाळ याची ऑल इंडिया स्विमिंग स्पर्धेसाठी निवड…

संजीवन विद्यानिकेतनचे जिल्हस्तरीय ज्युदो स्पर्धेत यश…

पन्हाळा (प्रतिनिधी) : संजीवन नॉलेज सिटी अंतर्गत असलेल्या संजीवन विद्यानिकेतनच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी शिवाजी विद्यापीठ येथे झालेल्या जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेमध्ये घवघवीत असे यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये तीन सुवर्णपदक, चार रोप्य आणि एक कांस्यपदक मिळवले. यामध्ये संजना मेहेत्रे, पौर्णिमा जाधव, श्रेयस पाटील या ज्युदो खेळाडूंनी सुवर्णपदक मिळविले. तर हिरण्या पाटील, संस्कृती कदम, सलोनी पाटील, शाहिद लिंगप्पा… Continue reading संजीवन विद्यानिकेतनचे जिल्हस्तरीय ज्युदो स्पर्धेत यश…

‘सिकंदर’ ठरला सलग दुसऱ्या वर्षी ‘भीमा केसरी’चा मानकरी…

सोलापूर (प्रतिनिधी) : प्रेक्षकांनी गजबजलेल्या टाकळी सिकंदरच्या भीमा केसरी कुस्ती मैदानात, मोहोळच्या पै.सिकंदर शेख याने पंजाबच्या पै. प्रदिपसिंगला एकचाक डावावर आस्मान दाखवत, भीमा केसरीचा बहुमान व चांदीची गदा पटकावली. तसेच महेंद्र गायकवाडने देखील उत्तम खेळ दाखवत, पंजाबच्या पै. दिनेश वर विजय मिळविला. भीमा कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी भरविलेल्या या कुस्त्यांच्या मैदानात, सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील… Continue reading ‘सिकंदर’ ठरला सलग दुसऱ्या वर्षी ‘भीमा केसरी’चा मानकरी…

पन्हाळा येथिल सई पाटीलची राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी निवड…

पन्हाळा (प्रतिनिधी) : ६ आणि ७ जानेवारी रोजी श्री पाटीदार भवन, नागपूर येथे होणाऱ्या सतराव्या राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेसाठी पन्हाळा विद्यामंदिरातील सई पाटील हिची निवड झालेली आहे. सईला अपर्णा महाडीक (आंतरराष्ट्रीय,NIS प्रशिक्षक) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विजय पाटील, बाळकृष्ण पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले.

28 देशातील स्पर्धक झाले सहभागी; अबॅकस स्पर्धेत कुरुंदवाडची स्वरा बाबर चमकली

कुरुंदवाड ( प्रतिनिधी कुलदीप कुंभार ) मुंबई येथे दि. 28/12/2023 रोजी पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन संपन्न झाली या स्पर्धेमध्ये कुरुंदवाडमधील कुमार विद्या मंदिर नं 3 या शाळेतील कु स्वरा निलेश बाबर या विदार्थीनीने दुसरा क्रमांक मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे. पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा भारतात प्रथमच घेण्यात आली आहे. या… Continue reading 28 देशातील स्पर्धक झाले सहभागी; अबॅकस स्पर्धेत कुरुंदवाडची स्वरा बाबर चमकली

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत देसाई विद्या मंदिरचे यश…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) :- उदगाव जिल्हा परिषद कोल्हापूरच्या “अध्यक्ष चषक” क्रीडा स्पर्धा सर्वत्र उत्साहात सुरु आहेत.चिंचवाड येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत देसाई विद्या मंदिर उदगाव शाळेने यश संपादन केले. लहान गटातील खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून तालुकास्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ५०मीटर धावणेमध्ये अतिक यासीन मुल्लाणी यांने प्रथम क्रमांक पटकावला तर १०० मीटर धावणेमध्ये सार्थक… Continue reading केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत देसाई विद्या मंदिरचे यश…

error: Content is protected !!