आजरा तालुक्यात वाड्यावस्त्यांवर क्रेझ राजेंचीच..!

आजरा (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीची प्रचार रणधुमाळी आता वेगवान टप्प्यावर आली आहे. आजरा तालुक्यातही प्रचाराचा धुरळा उडाला आहे. इंडिया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उमेदवार शाहू छत्रपती, संभाजीराजे छत्रपती व संयोगितराजे छत्रपती यांनी आजरा तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवरील मतदारांशी थेट संपर्क साधण्याची मोहिम जवळपास अंतिम टप्प्यापर्यंत नेली आहे. त्यांच्या या धडाकेबाज प्रचार मोहिमेमुळे… Continue reading आजरा तालुक्यात वाड्यावस्त्यांवर क्रेझ राजेंचीच..!

हमीदवाडा कारखाना विकल्याचा विरोधकांकडून खोटा आरोप : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : हमीदवाडा साखर कारखाना कर्नाटकातल्या व्यक्तीला विकल्याचा धडधडीत १०० टक्के खोटा आरोप विरोधकांकडून केला आहे. राजकारणासाठी किती बदनामी आणि अपप्रचार करणार आहात ? असा संतप्त सवाल पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पेरून मुद्दामहून श्री शाहू महाराजांच्या विरोधात विधाने करावीत, असा तर हेतू नाही ना ? त्यामुळे शाहू महाराजांची प्रतिमा… Continue reading हमीदवाडा कारखाना विकल्याचा विरोधकांकडून खोटा आरोप : ना. हसन मुश्रीफ

पन्हाळा तालुक्यातून धैर्यशील माने यांना 85 टक्के मतदान देणार : डॉ. विनय कोरे

कोतोली (प्रतिनीधी) : ज्योतिबाचा गुलाल ज्याच्या बाजूला आहे त्याच्यावर परमेश्वराच्या कृपेने विजयाचा गुलाल पडणार आहे. असं मत जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी व्यक्त केलं. त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यातून 85 टक्के मतदान धैर्यशील माने यांना मिळवून देऊ असं अभिवचन दिले. ‘जनसुराज्य शक्ती ज्याच्या बाजूने जाते, त्या बाजूला गुलाल पडतो’ या इतिहासाची पूर्णवृत्ती होणार अशी ग्वाही… Continue reading पन्हाळा तालुक्यातून धैर्यशील माने यांना 85 टक्के मतदान देणार : डॉ. विनय कोरे

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान कोल्हापूर दौऱ्यावर : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हयातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहेत. कोल्हापूर लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार प्रा.संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ महायुतीचे शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा २८ एप्रिल रोजी तपोवन मैदान, कोल्हापूर येथे होणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर… Continue reading महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान कोल्हापूर दौऱ्यावर : राजेश क्षीरसागर

अतिग्रे येथे सत्यजित पाटील-सरुडकरांचे जल्लोषी स्वागत…

हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचा प्रचार दौरा हातकणंगले तालुक्यातील शिरोली, हेरले, माले, मुडशिंगी, अतिग्रे गावात झाला. यावेळी त्यांच्या सोबत आमदार राजुबाबा आवळे, शिवसेनेचे माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर, माजी आमदार राजू आवळे यांची उपस्थिती होती. यावेळी अतिग्रे येथे प्रचार रॅलीचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना गटाच्या प्रमुखांनी… Continue reading अतिग्रे येथे सत्यजित पाटील-सरुडकरांचे जल्लोषी स्वागत…

महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी सर्वांनी एकदिलाने काम करा : ना. चंद्रकांत पाटील

सांगली (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या वेळी जमलेल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद देखील साधला. या वेळी आ. सुधीर गाडगीळही उपस्थित होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाच्या विकासाची गती वाढविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अहोरात्र मेहनत घेत आहेत. याच… Continue reading महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी सर्वांनी एकदिलाने काम करा : ना. चंद्रकांत पाटील

डॉ. बाबासाहेबांच्या शोभायात्रेत चंद्रकांत पाटीलांचा सहभाग…

पुणे (प्रतिनिधी) : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील विमाननगर परिसरात भव्य शोभायात्रेत सहभाग घेतला. ना. चंद्रकांत पाटील यांनी, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तक्षशिला प्रतिष्ठान आणि राहुल भंडारे यांच्या वतीने पुण्यातील विमाननगर परिसरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले… Continue reading डॉ. बाबासाहेबांच्या शोभायात्रेत चंद्रकांत पाटीलांचा सहभाग…

आमची संपूर्ण ताकद आपल्या पाठिशी : आ. प्रकाश आवाडे

इचलकरंजी (प्रतिनिधी) : ताराराणी पक्षाच्या माध्यमातून आमची संपूर्ण ताकद आपल्या पाठीशी उभी राहिल. गतवेळीपेक्षा अधिकचे मताधिक्य इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून देण्यासाठी आम्ही झटू. निश्‍चिंत रहा विजय आपला आहे, असा विश्‍वास आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांना दिला. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी आज (सोमवार) इचलकरंजीत ताराराणी पक्ष कार्यालयात येऊन आमदार प्रकाश… Continue reading आमची संपूर्ण ताकद आपल्या पाठिशी : आ. प्रकाश आवाडे

प्राण जाये पर वचन न जाये ; माजी आमदार के. पी. पाटील यांचे अभिवचन..!

प्रा संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ मुदाळ येथील मेळाव्याला जोरदार प्रतिसाद भुदरगड (प्रतिनिधी ) : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आदेश आणि हसन मुश्रीफ यांचे पाठबळ याद्वारेच आम्ही या लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक यांना पाठिंब्याची भूमिका घेतली. जी गोष्ट पोटात, तीच आमच्या ओठात. त्यामुळे या निवडणुकीत प्राण जाये पर वचनांना जाये, असे अभिवचन माजी आमदार के.… Continue reading प्राण जाये पर वचन न जाये ; माजी आमदार के. पी. पाटील यांचे अभिवचन..!

भुदरगडमधील अंतुर्ली साठवण तलावाचे कामकाज पाडले बंद…

कडगाव (प्रतिनिधी) : सोळा वर्षांपूर्वी कामाची सुरुवात करून ठेवली. मात्र, बाधित शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनीचा झाडा, बेटांचा, घरांचा मोबदला न देता पुन्हा 2024 झाली काम चालू केले. एखाद्या प्रकल्पाचे काम पाच वर्षात पूर्ण केले नाही तर या कामाची लागणाऱ्या जमिनीची पुन्हा संपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मात्र, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून काम पूर्ण करण्याचा यंत्रणेचा… Continue reading भुदरगडमधील अंतुर्ली साठवण तलावाचे कामकाज पाडले बंद…

error: Content is protected !!