रशिवडेत यंदा गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात…

राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडेत यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्तपणे साजरा होत आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. राशिवडेमध्ये पंचवीससहून अधिक सार्वजनिक मंडळांनी गणेशांच्या मुर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. या श्री मुर्तींचे विसर्जन ६ सप्टेंबर रोजी होत आहे. या मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर यावेळी दुबई येथील पतु डान्सग्रुप, रिच हायपर ड्राईव्ह ऑडिओ,  गुजरात येथील… Continue reading रशिवडेत यंदा गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात…

‘पीएम किसान’ च्या ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पीएम किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण करुन घेणे बंधनकारक असून यासाठी ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीत संबंधित लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही, तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, असे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले. पी. एम. किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या ई-केवायसी प्रमाणीकरणाचे काम सध्या सुरु असून यासाठी… Continue reading ‘पीएम किसान’ च्या ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी

टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू…

मुंबई (प्रतिनिधी) : टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे आज (रविवार)  पालघर येथे झालेल्या अपघातात मिस्त्री यांचे निधन झाले आहे. हा अपघात आज दुपारच्या सुमारास घडला. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास पालघर येथील सूर्या नदीवरील पुलावर दुभाजकाला कार आदळून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर जागीच सायरस मिस्त्री त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर… Continue reading टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू…

आ. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ५६ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार….

कागल (प्रतिनिधी) : तुम्ही अथक परिश्रमाने विद्यार्थ्यांना मेरिटमध्ये आणणारच आहात. सोबतच त्यांना जागरूक नागरिकही घडवण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे आवाहन आ. हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच शिक्षक हे राष्ट्रनिर्माता असल्याचेही म्हणाले. ते कागलमध्ये मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने आयोजित केलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. प्रा. जयंत आसगांवकर होते. आ. मुश्रीफ म्हणाले की, ज्यांच्या… Continue reading आ. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ५६ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार….

शिवाजी विद्यापीठात स्टार्टअप यात्रेचे आगमन

कोल्हापूर :  राज्यातील नावीन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप यात्रा-२०२२ चे आगमन आज (शनिवार) शिवाजी विद्यापीठात झाले. यात्रेचे स्वागत झेंडा फडकवून कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस्. पाटील यांनी केले. आपल्या आजूबाजूला असलेल्या अडचणी दूर करण्याच्या माध्यमातूनच नव्या कल्पना जन्माला येतात. यातून नवे स्टार्टअप सुरू होतात असे दिसून… Continue reading शिवाजी विद्यापीठात स्टार्टअप यात्रेचे आगमन

चंदगडच्या कांबळे कुटुंबाचा संसार केडीसीसी बँकेने सावरला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : क्रूर नियतीने संसार मोडला होता, तो केडीसीसी बँकेने सावरला; अशी कृतज्ञतापूर्वक भावना चंदगडच्या मंगल सुरेश कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली. बँकेच्या सेवेत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर बँकेने मुलाला सेवेत घेतले. त्याच्याही अपघाती मृत्यूनंतर मुलीला सेवेत घेतले. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी संचालक मंडळाच्या बैठकीत पल्लवी सुरेश कांबळे हिला नोकरीचे नियुक्तीपत्र… Continue reading चंदगडच्या कांबळे कुटुंबाचा संसार केडीसीसी बँकेने सावरला

विमानतळाचे नवीन टर्मिनल मार्चअखेर पूर्ण करा : मंत्री सिंधिया

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंगचे काम मार्च अखेर पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिले. कोल्हापूर येथील विमानतळ विस्तारीकरणाबाबत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,… Continue reading विमानतळाचे नवीन टर्मिनल मार्चअखेर पूर्ण करा : मंत्री सिंधिया

ज्योतिरादित्य सिंधिया यांचा खा. महाडिक कुटुंबीयातर्फे सत्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. त्यांनी लोकप्रतिनिधी आणि महाडिक कुटुंबीयांबरोबर विविध विषयांवर चर्चा केली. खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते सिंधिया यांचा शाल-श्रीफळ आणि श्री अंबाबाईची प्रतिमा देऊन, तसेच उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचाही महाडिक कुटुंबीयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. खासदार संजयकाका पाटील… Continue reading ज्योतिरादित्य सिंधिया यांचा खा. महाडिक कुटुंबीयातर्फे सत्कार

नाईट लँडिंग मार्ग तातडीने सुरू करण्याची काँगेसची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळ जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेसाठी नाईट मार्गाची निश्चिती तातडीने करावी, कार्गो सुविधा सुरू करावी, वाहतुकीची नवी क्षेत्र निश्चित करावी, अशा विविध मागण्या काँगेस आमदारांच्या वतीने  केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (सिंधिया) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.  या निवेदनावर आ. सतेज पाटील, आ. ऋतुराज… Continue reading नाईट लँडिंग मार्ग तातडीने सुरू करण्याची काँगेसची मागणी

प्रत्येक कुटुंबात पर्यावरण संवर्धनाचे बीज रुजवावे : काशीनाथ कांबळे

टोप (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येक कुटुंबात पर्यावरण रक्षण व संवर्धनाचे बीज रुजवल्यास भविष्यात चांगले पर्यावरण निर्माण होईल व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचे आरोग्य सुधारेल, असे मत सरपंच काशीनाथ कांबळे यांनी व्यक्त केले. मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील श्रीपती चौगुले सांस्कृतिक क्रीडा मंडळ व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांना कोविडचे डोस देण्यात आले. शिवाय… Continue reading प्रत्येक कुटुंबात पर्यावरण संवर्धनाचे बीज रुजवावे : काशीनाथ कांबळे

error: Content is protected !!