.टोप (प्रतिनिधी) : शिरोली (ता. हातकणंगले) येथील जय मल्हार ग्रामीण गॅस एजन्सीच्या वतीने कोरगावकर कॉलनी येथे आज (सोमवार)  रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले होते. या शिबिरात गावातील सुमारे १३५ जणांनी रक्तदान केले.  

कोरोनामुळे गेले आठ महीने रक्तदान शिबिरे बंद पडली होती. राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारतर्फे रक्तदानाचे आवाहन करण्यात आले आहे.  त्यानुसार सामाजिक बांधिलकी म्हणून माजी ग्रा.पं. सदस्य सागर कौंदाडे आणि राष्ट्रीय कबड्डीपटू दिग्विजय कौंदाडे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये गावातील सुमारे १३५ जणांनी रक्तदान केले. माजी आमदार अमल महाडिक यांनी याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. या शिबिराचे उद्घाटन उद्योजक योगेश खवरे, धनाजी पाटील, डॉ. सुभाष पाटील  यांनी केले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी जय मल्हार गॅस एजन्सी, जीवनधारा ब्लड बॅंक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका, आण्णा सातपुते आदींसह कर्मचारी, ग्राहक उपस्थित होते.