इचलकरंजी (प्रतिनिधी) : मुद्रक दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी  मुद्रक संघातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांच्या हस्ते जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले.

मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या जयंतीनिमित्त मुद्रक संघातर्फे विविध कार्याक्रमाचे आयोजन केले जाते. परंतु या वर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सर्व कार्यक्रम रद्द करून रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी इचलकरंजीच्या आधार ब्लड बँकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर पार पडले. यावेळी ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले..

यावेळी संघाचे अध्यक्ष निवोद मद्यापगोळ,  इव्हेंट मॅनेजर नरेंद्र हरवंदे, खजानिस बंटी जैन, गणेश वरुटे, स्वप्निल नायकवडी, कलगोंड पाटील, संतराम चौगुले, संजय निकम, दिनेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.