भाजपची पोलखोल : कृषी कायद्यांच्या जाहिरातीमधील शेतकरी करतोय आंदोलन

0
205

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबमध्ये नव्या कृषी कायद्यांसंदर्भात भाजपने जाहिरातबाजी करण्यासाठी पोस्टर लावले आहेत. यावर  हरप्रीत सिंग नावाच्या एका शेतकऱ्याचा फोटो लावला आहे.  या जाहिरातीत नव्या कृषी कायद्यांमुळे हरप्रीत सिंग आनंदी असल्याचे दाखवले आहे. मात्र, हेच हरप्रीत सिंग गेल्या २ आठवड्यांपासून सिंघू सीमेवर शेतकऱ्यांसोबत आंदोलन करत आहेत. त्यामुळे भाजपची पोलखोल झाली आहे.

भाजपने आपला फोटो परवानगीविना बेकायदेशीरपणे वापरला असल्याचा आरोप करून हरप्रीत यांनी  नाराजी व्यक्त केली आहे.  काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट केलेला फोटो भाजपने जाहिरातीत वापरला आहे. याची माहिती मला माझ्या  मित्रांनी दिली. मात्र, माझा फोटो वापरण्यापूर्वी कोणतीही परवानगी घेतलेली नाही.  लोक मला भाजपचा पोस्टर बॉय म्हणू लागले आहेत. पण मी भाजपचा नव्हे  शेतकऱ्यांचा पोस्टर बॉय आहे,  असे हरप्रीत म्हणाला. मी आता भाजपच्या जाहिरातीसह स्वत:चा ओरिजनल फोटो भाजपला पाठवणार असून कायदेशीर नोटीसही पाठवणार असल्याचे त्यांने सांगितले. दरम्यान, हरप्रीत पंजाबच्या होशियारपूरचे रहिवासी असून त्यांना शेतीसोबत अभिनयाची देखील आवड आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here