भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वाहनांच्या ताफ्यावर हल्ला

0
49

कोलकाता (वृत्तसंस्था) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल दौऱ्यावर गेलेल्या भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या ताफ्यावर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. कैलाश विजयवर्गीय यांनी कारमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

यामध्ये त्यांचा ताफा जात असताना रस्त्यावर घोषणाबाजी करून दगडफेक होत असल्याचे दिसत आहे. तसेच दगडफेक करत गाडीच्या काचाही फोडल्याचे दिसत आहे. व्हिडीओमध्ये गाडीमध्ये आलेला दगडही त्यांनी दाखवला आहे. दरम्यान, बंगाल पोलिसांना जे पी नड्डा यांच्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती. पण पुन्हा एकदा बंगाल पोलीस अपयशी ठरली. पोलिसांसमोर तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आणि माझ्या गाडीवर दगडफेक केली, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here