भाजपचा खासदार राजीनामा देणार..? 

0
523

अहमदाबाद ( प्रतिनिधी) : गेल्या महिन्यांपासून कृषी कायद्यांविरोधात हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तर दुसरीकडे गुजरातमधील भाजप खासदाराने पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा सदस्यत्वाचाही आपण राजीनामा देणार असल्याचे खासदाराने म्हटले आहे. 

भरुच लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार असलेल्या मनसुखभाई धनजीभाई वसावा यांनी २८ डिसेंबर रोजी गुजरात प्रदेश भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली आहे. मात्र, मनसुख वासवा यांनी राजीनामा देण्यामागचे  कारण स्पष्ट केलेले नाही.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे गुजरात गृहराज्य आहे. त्यामुळे पक्षासाठी हा    मोठा धक्का  मानला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here