अपघातात भाजप आमदार बचावले : तरुण-तरूणी ठार   

0
67

मुंबई (प्रतिनिधी) : कल्याण तालुक्यातील दहागावजवळ झालेल्या अपघातात भाजप आमदार किसन कथोरे थोडक्यात बचावले. तर दुचाकीवरील तरूण-तरुणी ठार झाले. आमदार कथोरे यांच्या  मणक्याला दुखापत झाली असून  त्यांना उपचारासाठी कल्याणमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

या अपघातात  अमित नंदकुमार सिंग (रा. पिसवली, कल्याण ग्रामीण)  आणि सिमरन सिंग या तरूणीचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार कथोरे यांच्या गाडीने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यात गाडीची एअर बॅग फुटली. तर आमदार कथोरे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. तर दुचाकीवरील तरुण तरुणी ठार झाले. अधिक तपास टिटवाळा पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here