कोल्हापुरात भाजपतर्फे अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

0
66

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने बिंदू चौकात माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना ९६ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. प. म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव व जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या हस्ते अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

याप्रसंगी अटलजींबद्दल मनोगत व्यक्त करताना भाजपा गटनेते अजित ठाणेकर यांनी अटलजींच्या कवितेतील “बाधायें आती है आए घिरे प्रलय की घोर घटाये’, पाँवो के नीचे हो अंगारे, सिर पर बरसे यदी ज्वालायें’ ह्या पंक्ती उद्धृत  केल्या.

या वेळी जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये, सरचिटणीस दिलीप मेत्राणी,  उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, मारुती भागोजी, सचिन तोडकर, विजय आगरवाल, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हर्डीकर, तौफिक बागवान, हितेंद्र पटेल, महिला अध्यक्षा गायत्री राउत, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, भरत काळे, संदीप कुंभार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here