कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशात ‘सेवा सप्ताह’चे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने सुरु असलेल्या सेवा सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत आज (शनिवार) दिव्यांगांना कृत्रिम उपकरणांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदर चंद्रकांतदादा पाटील होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यामध्ये सुमारे २५०हून जास्त दिव्यांगाना श्रवण यंत्र,  वॉकर,  कुबड्या, व्हील चेअर, अंध व्यक्तींसाठी काठी,  वयस्कर लोकांना हॅन्डीकॅप स्टिक उपकरणांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७०वा वाढदिवस आपण सेवा सप्ताह म्हणून साजरा करत आहेत. नरेंद्र मोदी यांचा पिंड नेतृत्वाचा, प्रशासकाचा आहे, परंतु त्यांचा मुळचा पिंड सेवेचा आहे. त्यामुळे कोरोनाची मर्यादा लक्षात घेऊन त्यांचा वाढदिवस आपण देशभर लोकांच्या सेवेच्या माध्यमातून साजरा करत आहोत. गेल्या ५ वर्षात भाजपा सरकारने लोकांच्या सेवाकार्यामध्ये कोणतीही कमतरता ठेवली नाही.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरचिटणीस विजय जाधव यांनी केले. आणि कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा चिटणीस सुनीलसिंह चव्हाण, अभिजित शिंदे, विश्वास जाधव, अक्षय निरोखेकर, दिलीप बोंद्रे, रघुनाथ पाटील, दिनेश पसरे, महादेव बिरंजे, दत्ता लोखंडे, नाजीम अत्तार, कालिदास बोरकर, बापू राणे, रंगनाथ शिवशरण, गौरव सातपुते, देवरथ लोंढे, योगेश साळोखे, सागर आथणे, विनय रंगलाणी यांनी केले.

कार्यक्रमास जिल्हा अध्यक्ष राहुल चिकोडे, उपाध्यक्ष अमोल पालोजी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव,विजय आगरवाल, संजय सावंत, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, भाजपा गटनेते अजित ठाणेकर, मंडल अध्यक्ष भरत काळे, संतोष माळी, डॉ. राजवर्धन, मामा कोळवणकर, गणेश चिले, इक्बाल हकीम, राजाराम नरके, सुभाष माळी, संजय जासूद, पिराजी फराडे आदी उपस्थित होते.