मुंबई (प्रतिनिधी) : हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळ या राज्यांमधील स्थलांतरीत पक्षांमध्ये बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग आढळून आलेला आहे. परंतु महाराष्ट्रात वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळयांमध्ये अथवा कोंबडयांमध्ये या रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही. किंवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.

प्रत्येक वर्षी पशुसंवर्धन विभागाद्वारे बर्ड फ्लू सर्वेक्षण कार्यक्रम घेतला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यांतील पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीसाठी घेतले जातात. याची तपासणी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे दरवर्षी बर्ड फ्लु सर्व्हेक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीसाठी गोळा करण्यात येतात. याची तपासणी पुणे येथील पश्चिम विभागीय रोगनिदान प्रयोगशाळेत केली जाते. एकूण १७१५ विष्ठा नमूने, १९१३ रक्तजल नमुने १५४९ घशातील द्रवांचे नमुन्यांची तपासणी आरटीपीसीआर आणि एलायझा या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करुन केलेली आहे. तपासणीअंती वरील सर्व नमूने बर्ड फ्लू रोगासंदर्भात निगेटिव्ह आले आहेत.  त्यामुळे कुक्कुटपालक व्यावसायिक आणि नागरिकांनी चिंता करू नये.

तसेच स्थलांतरीत होणाऱ्या जंगली पक्षांमध्ये, कावळयांमध्ये, परसातील कोंबडयांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन होणाऱ्या ठिकाणी  असाधारण स्वरुपाची मर्तूक आढळून आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.