पुणे (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे केले आहेत. त्यांच्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना फायदाच होणार आहे. परंतु, दिल्लीत काही बिनकामी लोकांनी शेतकऱ्यांच्या नावाखाली आंदोलन सुरू केले आहे, अशी टीका खासदार गिरीश बापट यांनी केली. पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

खासदार बापट म्हणाले की, दिल्लीत आंदोलन कोण करत आहे, कम्युनिस्ट पक्ष आपला अजेंडा रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे. स्वतःला शेतकरी नेते म्हणणारे शरद पवार यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे, याचेच वाईट वाटते. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय मोदी यांनी घेतले आहेत, त्याला विरोध करायचा म्हणून विरोध केला जात आहे. सामान्य शेकऱ्यांना राजकरण नको आहे, त्यांना आपल्या मामला योग्य भाव मिळावा असे वाटते. भाजपच्या भगव्यापुढे कम्युनिस्ट पक्ष टिकेल का हो. आमचे आव्हान काँग्रेसला नाही.