बसवराज टक्कळगी ‘बेस्ट अॅक्टर’ अॅवार्डने सन्मानित

0
48

इचलकरंजी (प्रतिनिधी)  :  नेक्स जेन संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म महोत्सवामध्ये वस्त्रनगरीतील उदयोन्मुख कलाकार बसवराज टक्कळगी यांना ‘बेस्ट अॅक्टर’ अॅवार्ड देवून सन्मानित करण्यात आले. इचलकरंजीत महेश क्लबमध्ये झालेल्या शानदार समारंभात इचलकरंजी शहर वाहतूक नियंत्रण कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या हस्ते व नेक्स जेन संस्थेचे अध्यक्ष सुरज साळुंखे, संचालिका रविना साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

फिल्म महोत्सवाची सुरुवात माजी नगरसेवक रवी रजपूते यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सुमारे ६५० हून अधिक शॉर्ट फिल्म सादर करण्यात आल्या होत्या. यामध्ये लेखक अजय पाटील यांनी लिहिलेली कथा व रमेश रजपूत यांनी दिग्दर्शित  केलेली ‘मी जिंकणार’ या फिल्ममध्ये दारुड्या सतिशची भूमिका कलाकार बसवराज टक्कळगी यांनी अत्यंत उत्कृष्टरित्या साकारुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली होती. या फिल्ममधील वैशाली तिवडे यांना बेस्ट अॅक्ट्रेस पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

यावेळी  दिग्दर्शक रमेश रजपूत, लेखक अजय पाटील, दादासो कांबळे, सलिम संजापूरे, असिफ संजापूरे, राजू म्हेत्रे, राजू शेख, हुसेन हैदर, अनिकेत नवले आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here