कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिवाळीनिमित्त राष्ट्रीयकृत बँका उद्या (शनिवार) पासून तीन दिवस बंद राहणार आहेत. शनिवार, रविवार, सोमवार असे सलग तीन दिवस बँकांना सुट्टी असेल. या कालावधीत ज्यांना पैशाची गरज आहे, त्यांना एटीएमला जावे लागणार आहे. इतर बँक कामकाज असलेल्यांची गैरसोय होणार आहे.

दिवाळीला सुरूवात झाली आहे. यंदा दिवाळीत शनिवार, रविवारी आल्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुट्टीचा बोनस मिळाला आहे. दिवाळीत विविध वस्तूंची खरेदी असते. अशावेळीच बँका बंद असल्याने अनेकांची गैरसोय होणार आहे. सहकारी, नागरी बँका आणि पतसंस्था मातर ठेवीसाठी काही तास उघड्या ठेवण्यात येणार आहे. तीन दिवसांच्या बंदनंतर राष्ट्रीयकृत बँका सुरू झाल्यानंतर मंगळवारी गर्दी होण्याची शक्यता आहे. कोरोनाचा काळ असल्याने गर्दी नियंत्रणात ठेवण्याचे नियोजन बँक प्रशासनास करावे लागणार आहे.