कोतोली (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी दौलत देसाई, तहसिलदार रमेश शेंडगे यांनी देलेल्या आदेशाचे पालन करुन मोटरसायकलवर ‘नो मास्क, नो एन्ट्री’, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, यासह कोरोनाबाबतचे विविध संदेश जनजागृतीचे स्टीकर लावून कोतोली मुख्य बाजारपेठेत उपक्रम राबवून जनतेला दिलासा दिला आहे.

या उपक्रमामध्ये कोतोली मंडल अधिकारी सतीश ढेंगे, तलाटी प्रकाश सुर्यवंशी, कोतवाल संतोष गवळी, कृष्णात पाटील यांनी सहभाग घेऊन सदर उपक्रम व्यापक स्वरुपात राबवून सर्वसामान्य जनतेपर्यंत कोरोनाला रोखायचा कसा, हा संदेश या स्टीकर मार्फत दिला गेला आहे. सदर उपक्रमात युवावर्ग फार मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन कोतोली परिसरातील आदी गावातील नवयुवक तरुणांपर्यत सदर संदेश पोहचवून कोरोनापासून मुक्ती मिळवाण्यासाठी सर्वच स्थरातून व्यापक स्वरुपात लोकचळवळ बनवली आहे. या उपक्रमांने या परिसरातून आनंमय सूर सर्वसामान्य जनतेतून उमटत आहेत.