गोदावरी एक्सप्रेसमध्ये २६ व्या वर्षीही गणेशाची स्थापना

मनमाड (प्रतिनिधी) :  गणेश मंडळाकडून प्रत्येक वर्षी श्री गणेशाची स्थापना चक्क मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस रेल्वेमध्ये केली जाते. यंदाही गणेश भक्तांनी श्री गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात केली आहे. मनमाड रेल्वे जंक्शन हे देशाचे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन असून, या रेल्वे स्थानकातून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करीत असतात. गणेशोत्सवाच्या काळामध्ये चक्क श्री गणेश मनमाड ते मुंबई… Continue reading गोदावरी एक्सप्रेसमध्ये २६ व्या वर्षीही गणेशाची स्थापना

गणेशोत्सवात गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला

सोलापूर (प्रतिनिधी) : अष्टविनायक गणपती पैकी सातवा गणपती म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या तळे हिप्परगा येथील मशरूम गणपतीचा सोन्याचा कळस बुधवारी सकाळी चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या कळसाला २८ तोळे सोन्याच्या मुलामा दिलेला होता. सुमारे २५ किलो वजनाचा हा कळस असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे सहा वर्षांनंतर पुन्हा दुसऱ्यांदा हा… Continue reading गणेशोत्सवात गणपती मंदिरावरील सोन्याचा कळस चोरीला

कुरुंदवाडमध्ये न.पा. कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यासह शिक्षकांना त्रास

कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कुरुंदवाड नगरपरिषदेच्या धर्मशाळेमध्ये राहणाऱ्या नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून जि.प.च्या कुमार विद्यामंदिर नंबर ३ मधील विद्यार्थ्यासह शिक्षक यांना वेगवेगळ्या प्रकारे नाहक त्रास दिला जातो. यापासून शिक्षक आणि विद्यार्थी यांची सुटका करावी, या आशयाचे निवेदन प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल जाधव यांना मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांनी दिले आहे. या धर्मशाळेच्या इमारतीमध्ये… Continue reading कुरुंदवाडमध्ये न.पा. कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यासह शिक्षकांना त्रास

पुण्यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे झाले जंगी स्वागत

पुणे (प्रतीनिधी) : पुण्यातील पाच मानाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना विधिवत झाली. ढोल ताशांच्या गजरात दोन वर्षांनी बाप्पा विराजमान झाले आहेत. मानाचा पहिला श्री कसबा गणपती येथील मंडळाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा सन्मान म्हणून हुतात्मा राजगुरु यांचे नातू धैर्यशील आणि सत्यशील यांच्या हस्ते बप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मानाच्या दुसऱ्या श्री तांबडी जोगेश्वरी मंडळाच्या ‘श्रीं’च्या… Continue reading पुण्यामध्ये ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे झाले जंगी स्वागत

माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन

मास्को (वृत्तसंस्था) : शीतयुद्ध संपुष्टात आणणारे माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ९१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून मिखाईल गोर्बाचेव्ह हे आजारी होते. रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गोर्बाचेव्ह हे १९८५ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस बनले होते. तसेच १९९१ पर्यंत ते या पक्षाचे सरचिटणीस होते. त्यानंतर… Continue reading माजी सोव्हिएत राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन

लालबाग राजाच्या मंडपात धक्काबुक्की

मुंबई (प्रतिनिधी) :  दोन वर्षांनंतर राज्यात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे उत्साला उधाण आले आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी लोटली आहे. पहाटेच लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली; मात्र पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या मंडपात राडा पाहायला मिळाला. मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम… Continue reading लालबाग राजाच्या मंडपात धक्काबुक्की

मुंबईमध्ये हर्षोल्हासात गणरायाचे आगमन

मुंबई (प्रतिनिधी) आजपासून गणेश उत्सावाला सुरुवात झाली आहे. लाडक्या गणरायाचा जयघोष संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. राज्याची राजधानी मुंबईत देखील गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून, लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईमध्ये हर्षोल्हासात सर्वत्र गणरायाचे मोरयाच्या जयघोषात आगमन झाले. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी तब्बल १० ते १५ किलोमीटर दूरपर्यंत रांगा लावल्याचे पाहायला… Continue reading मुंबईमध्ये हर्षोल्हासात गणरायाचे आगमन

पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ नाही

दिल्ली (वृत्तसंस्था) : तब्बल दोन वर्षांनी राज्यासह देशभरात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आज घराघरात लाडक्या बाप्पाचं आगमन झाले आहे. सणासुदीच्या काळातही महागाईने कळस गाठला असून, भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर नेहमीच जाहीर होतात; मात्र आज गणेश चतुर्थीच्या दिवशी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ अथवा घट करण्यात आलेली नाही. त्यामुळे वाढत्या महागाईच्या काळात… Continue reading पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ नाही

कागलच्या अतिक्रमित झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण त्वरित करा : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कागल शहरातील सर्व अतिक्रमित झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण करण्यासाठी अधिकार्‍यांनी युद्ध पातळीवर कार्यवाही करावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजिसिंह घाटगे यांच्या पुढाकाराने या झोपडपट्ट्यातील अतिक्रमणे नियमितीकरण, कागल तालुक्यातील संजय गांधी… Continue reading कागलच्या अतिक्रमित झोपडपट्ट्यांचे नियमितीकरण त्वरित करा : चंद्रकांत पाटील

उद्योजक आर. एम. मोहिते यांना डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून २०२२-२३ यंदाचा ‘डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार’ उद्योजक आर. एम. मोहिते यांना जाहीर झाला आहे. विद्यापीठाचा १७ वा स्थापना दिवस गुरुवार, दि. १ सप्टेंबर रोजी साजरा होणार असून, या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार… Continue reading उद्योजक आर. एम. मोहिते यांना डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार

error: Content is protected !!