मोदी स्वत:च्या खिशातून करतात खानपानाचा खर्च

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या खानपानाचा खर्च स्वत:च्या खिशातून करतात. सरकारी बजेटमधून त्यांच्या खानपानावर एक रुपयाही खर्च केला जात नाही, अशी माहिती आरटीआयमधून देण्यात आली आहे. राजकीय नेत्यांच्या पगाराची, स्टाईलची जितकी चर्चा होते तितकी त्याच्या खानपानाचीही चर्चा रंगते. यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधींवर सरकारच्या तिजोरीतून होणाऱ्या एकूण खर्चाबाबत आणि खास सुविधांबाबत प्रश्न  उपस्थित केले… Continue reading मोदी स्वत:च्या खिशातून करतात खानपानाचा खर्च

सुभाषनगरमधील हद्दपार गुंडास अटक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हद्दपार केलेल्या सुभाषनगर येथील अंकुश बामणे (वय ३०)  या सराईत गुन्हेगारास राजाराम पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली. सुभाषनगरमधील बीजीएम गणेश मंडळाजवळ वावरत असताना राजारामपुरी पोलिसांनी त्याला पकडले. अंकुश बामणे याच्यावर २८ ऑक्टोबर २०२१ पासून हद्दपारीचा आदेश लागू केला असून तो पुढील २८ ऑक्टोबर २०२३ पर्यंत लागू राहणार आहे. गणेशोत्सवच्या अनुषंगाने राजारामपुरी पोलीस… Continue reading सुभाषनगरमधील हद्दपार गुंडास अटक

शिवसेनेच्या उपनेतेपदी अमोल कीर्तिकर, किशोरी पेडणेकर

मुंबई  (प्रतिनिधी ) : शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची पुनर्बांधणी सुरू केली आहे. त्यानुसार मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील कार्यकारिणी जाहीर झाली. त्यात अरविंद सावंत, भास्कर जाधव यांना नेतेपदाची जबाबदारी दिल्यानंतर… Continue reading शिवसेनेच्या उपनेतेपदी अमोल कीर्तिकर, किशोरी पेडणेकर

पुण्यात गणरायाच्या आगमनाला पावसाची जोरदार हजेरी

पुणे (प्रतिनिधी) : पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात गणेशाच्या आगमनाच्या दिवशी दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी उशिरापर्यंत शहराच्या काही भागात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशाच्या मिरवणुका आणि प्रतिष्ठापना दुपारपर्यंत पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळे त्यात पावसाचा अडथळा आला नाही; मात्र दुपारनंतरही मिरवणुका असलेल्या मंडळांना त्याचा काहीसा फटका बसला असला, तरी… Continue reading पुण्यात गणरायाच्या आगमनाला पावसाची जोरदार हजेरी

सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा बॅट हातात घेणार

मुंबई (प्रतिनिधी) मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा बॅट हातात घेणार आहे. तो रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या दुसऱ्या हंगामात पुन्हा एकदा सहभागी होण्याची शक्यता आहे. याआधीही त्याने पहिल्या हंगामात भारत लिजेंड्स संघाचे प्रतिनिधित्व केले होते. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर करून बराच काळ लोटला; मात्र क्रिकेटप्रेमींमध्ये मराठमोळ्या तेंडुलकरची… Continue reading सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा बॅट हातात घेणार

सोनिया गांधी यांना मातृशोक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाओला माईनो यांचे शनिवार, दि. २७ ऑगस्ट रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. त्यांच्यावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत दिली आहे. गेल्या २४ ऑगस्ट रोजी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सोनिया गांधी त्यांचा मुलगा राहुल गांधी… Continue reading सोनिया गांधी यांना मातृशोक

विद्यापीठ परीक्षांबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांबाबत समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती तसेच अफवा पसरविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या परीक्षेच्या अनुषंगाने काही अज्ञात समाजकंटकांनी विद्यापीठाच्या वेबसाईटवरील परिपत्रकात फेरफार करून दि. २३ ऑगस्ट रोजीचा एम.एस्सी.चा फिजिकल केमिस्ट्रीचा पेपर रद्द केल्याचे समाजमाध्यमांद्वारे व्हायरल केले. एका वृत्तपत्रातील… Continue reading विद्यापीठ परीक्षांबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कडक कारवाई

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ होत आहे. सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने जॅकलीन फर्नांडिसला २६ सप्टेंबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सुकेश चंद्रशेखरवर २०० कोटींहून अधिक रुपयांच्या वसुलीचा आरोप आहे. अलीकडेच, ईडीने याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात ईडीने जॅकलिन फर्नांडिसचे… Continue reading अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ

जगणं सुसह्य कर बाप्पा !

कोल्हापुरी ठसका कोल्हापूर (विशेष प्रतिनिधी) : आज घरोघरी, गल्ली बोळातल्या तालमी, मंडळांमध्ये सुखकर्ता, दु:खहर्ता, विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे आगमन झाले. आपापले दुःख, अडचणी, समस्या विसरून मोठ्या उत्साहाने सर्वांनीच बाप्पाचं स्वागत केलं. त्याच्याकडे सर्वांचं एकच मागणं आहे. ते म्हणजे आम्हा सर्वांचं जगणं सुसह्य कर. दिवसेंदिवस माणूस जगणंच विसरून गेला आहे. दुःख, अडचणी, समस्या, आजारपण, आर्थिक समस्या, बेरोजगारी,… Continue reading जगणं सुसह्य कर बाप्पा !

गोऱ्हेंना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून अडवले नव्हते : चंद्रकांत पाटील

पुणे (प्रतिनिधी): विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून कुणी अडवले नव्हते, असा टोला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे. विधिमंडळ अधिवेशनात पुण्याचे प्रश्न मांडले न गेल्यावरून नीलम गोऱ्हे यांनी जोरदार टीका केली होती. पुण्याचे प्रश्न न मांडले गेल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप करत पुण्याला कुणीच… Continue reading गोऱ्हेंना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून अडवले नव्हते : चंद्रकांत पाटील

error: Content is protected !!