रोटरी क्लब गार्गीजतर्फे १६ सप्टेंबरपासून ‘यामिनी’ प्रदर्शन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गेली तेरा वर्षे सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी कोल्हापुरातील रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने ‘यामिनी’ हे प्रदर्शन दि. १६ ते १८ सप्टेंबरपर्यंत तीन दिवस भरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन हॉटेल पॅव्हेलियन येथे भरवले जाणार आहे. या प्रदर्शनात ९३ हून अधिक विविध वस्तूंचे विक्रीसाठी स्टॉल्स असणार आहेत. याचे उद्घाटन दि. १६… Continue reading रोटरी क्लब गार्गीजतर्फे १६ सप्टेंबरपासून ‘यामिनी’ प्रदर्शन

रोट्रॅक्ट मुव्हमेंटचा पोलिस मित्र उपक्रम यशस्वी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : अनंत चतुर्दशी दिवशी विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांचे कार्यकर्ते व नागरिकांच्या गर्दीमुळे होणारा पोलिस यंत्रणेवरील ताण कमी करण्याच्या हेतूने रोट्रॅक्ट मुव्हमेंट इन कोल्हापूर या क्लबसच्या सदस्यांनी पोलिस मित्र हा उपक्रम राबविला. इराणी खण परिसरात तब्बल सहा तासांहून अधिक काळ सर्व रोट्रॅक्टर्संनी रस्त्यावर उतरून वाहतूक नियंत्रण, गर्दी कमी करणे, पोलिस दलाच्या सूचनेनुसार विसर्जनासाठी आलेल्या… Continue reading रोट्रॅक्ट मुव्हमेंटचा पोलिस मित्र उपक्रम यशस्वी

‘आप’तर्फे प्रत्येक जिल्ह्यांत ५ हजार युवकांची नोंदणी होणार

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकताच मेक इंडिया नं. १ मोहिमेची सुरुवात केली आहे. देशभरातील युवकांना यामध्ये जोडण्याच्या हेतूने ‘आप’ युवा आघाडीच्या वतीने युथ वुईथ मेक इंडिया नंबर १ मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांत पाच हजार युवकांना या सामील करणार असल्याचे ‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे… Continue reading ‘आप’तर्फे प्रत्येक जिल्ह्यांत ५ हजार युवकांची नोंदणी होणार

डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक उत्तम अभियंता घडवणार : गुप्ता

कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रत्येक विद्यार्थ्यांची वेगवेगळी स्वप्ने साकारण्यासाठी आई-वडील प्रयत्न करत असतात. आता कष्ट करून तुमच्या जीवनात यशस्वी व्हा. पुढील तीन वर्षात डी.वाय.पाटील ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगला इंजिनिअर आणि जबाबदार व्यक्ती बनवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू, असा विश्वास डी. वाय. ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी दिला. डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक,… Continue reading डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक उत्तम अभियंता घडवणार : गुप्ता

चंदूरच्या बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणी इचलकरंजीत मोर्चा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : चंदूर येथील नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला जीवे मारण्याच्या प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. नराधमाला कठोर शिक्षा करावी, या मागणीसाठी चंदूर ग्रा.पं. सदस्य, चर्मकार समाज, मनसे, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल अशा विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने इचलकरंजी येथील प्रांत कार्यालय व शिवाजीनगर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला.… Continue reading चंदूरच्या बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणी इचलकरंजीत मोर्चा

शाहू कारखान्यातर्फे १६ सप्टेंबरपासून मॅटवरील कुस्ती स्पर्धा

कागल (प्रतिनिधी) : येथील श्री छत्रपती शाहू साखर कारखान्यामार्फत शुक्रवार दि. १६ ते दि.१९ सप्टेंबर या दरम्यान मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी या स्पर्धा घेतल्या जातात. स्पर्धेचे हे  ३६ वे वर्ष आहे, अशी माहिती शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या कुस्ती स्पर्धा… Continue reading शाहू कारखान्यातर्फे १६ सप्टेंबरपासून मॅटवरील कुस्ती स्पर्धा

पन्हाळयात मृत्युंजय ग्रुपतर्फे गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

पन्हाळा (प्रतिनिधी) : येथील मृत्युंजय ग्रुपच्या वतीने वीस कुटुंबीयांना गृहोपयोगी वस्तू व शासकीय योजनेच्या कार्डचे वाटप माजी आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. मृत्युंजय ग्रुपने यापूर्वी कोरोना आणि पूरपरिस्थिती काळामध्ये गरीब जनतेसाठी जीवनोपयोगी वस्तूंचे, कपड्यांचे वाटप, रक्तदान शिबिर, नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा सत्कार, शालेय साहित्याचे वाटप, स्वच्छता मोहीम असे विविध उपक्रम राबवले आहेत. समाजोपयोगी कार्यामध्ये नेहमी… Continue reading पन्हाळयात मृत्युंजय ग्रुपतर्फे गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

नेज परिसरातील क्रशर बंद करण्याची मागणी

कुंभोज (प्रतिनीधी) : नेज हद्दीतील हातकणंगले-कुंभोज रोडवरील असलेल्या क्रशरच्या ठिकाणी शासन नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात कामकाज चालू असून, शासकीय यंत्रणांनी केलेले दुर्लक्ष नागरिकांच्या जिवावर बेतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे त्या परिसरातील क्रशर बंद करण्याची मागणी हातकणंगलेचे तहसीलदार यांच्याकडे नेज परिसरातील नागरिकांनी केली आहे. संबंधित क्रशर चालक हे कुठल्याच नियमांचे पालन करत नाहीत. हातकणंगले-कुंभोज रोडलगतच्या… Continue reading नेज परिसरातील क्रशर बंद करण्याची मागणी

स्कॉलरशिप, ऑनलाईन क्लासेसची सुविधा देणार सोनू सूद

मुंबई (प्रतिनिधी) : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता सोनू सूद कायमच चर्चेत असतो. कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये नागरिकांची मदत केल्यामुळे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक झाले होते. लॉकडाऊननंतरही सोनू सूदने त्याचे मदतीचे कार्य थांबवलेले नाही. अनेक माध्यमातून तो लोकांच्या मदतीसाठी कायमच धावून जात असतो. यासाठी त्याने संस्थादेखील सुरू केली आहे. सोनू सूदने गेल्या वर्षी यूपीएससी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या… Continue reading स्कॉलरशिप, ऑनलाईन क्लासेसची सुविधा देणार सोनू सूद

शेअर बाजारात तेजी ; निफ्टीने ओलांडला १८ हजारांचा टप्पा

मुंबई (प्रतिनिधी) : आज शेअर बाजारात सकाळी व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजीचे संकेत दिसून आले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स २९३.१६अंकांनी वधारत ६०,४०८ अंकांवर खुला झाला, तर एनएसई निर्देशांक निफ्टी १०८.१० अंकांनी वधारत १८,०४४ अंकांवर खुला झाला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ४२३ अंकांच्या ६०.५३८ .८६ अंकावर व्यवहार करत होता, तर निफ्टी १२२ अंकांनी वधारत… Continue reading शेअर बाजारात तेजी ; निफ्टीने ओलांडला १८ हजारांचा टप्पा

error: Content is protected !!