शिवाजी विद्यापीठामध्ये गुरुवारी कार्यशाळेचे आयोजन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग, भारत सरकार आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आजादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमांतर्गत ‘स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनुसूचित जमातीच्या स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेले योगदान’ या विषयावर गुरुवार, दि. १५सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के हे भूषवणार आहेत, तर… Continue reading शिवाजी विद्यापीठामध्ये गुरुवारी कार्यशाळेचे आयोजन

जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेती पाहणीसाठी कर्नाटक दौऱ्यावर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठ प्राणीशास्त्र विभाग सेंटर ऑफ इंक्युबेशन इन सेरिकल्चर आणि नाबार्ड बँक भारत सरकार यांच्या सहकार्याने कोल्हापूर जिल्ह्यातील २५ शेतकऱ्यांसाठी रेशीम शेती पाहणी दौरा कर्नाटक राज्यामध्ये दि. १४ ते १६ सप्टेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. केंद्रिय रेशीम संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हैसूर तसेच म्हैसूर विद्यापीठ रेशीम संशोधन केंद्र आणि कर्नाटक… Continue reading जिल्ह्यातील शेतकरी रेशीम शेती पाहणीसाठी कर्नाटक दौऱ्यावर

कुरुंदवाडमधील विकासासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शहराच्या विकासासाठी कोल्हापूर विभागाचे नगररचना सहायक संचालक अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालिका सभागृहात बैठक झाली. बैठकीत उपलब्ध जमीन वापर आराखडा, दाटीवाटीची जागा, महापुरामुळे येणार्‍या अडचणी, बांधकाम परवानाबाबत येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कुरुंदवाडचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी शहर विकास आराखड्याची माहिती सभागृहाला दिली. चर्चेत प्रस्तावित विकास आराखड्यात आरक्षित जागांमुळे नागरिकांना… Continue reading कुरुंदवाडमधील विकासासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा

कापूरवाडी येथे गायीला ‘लम्पी’ची लागण

टोप (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील कापूरवाडी येथील युवराज खोत यांच्या एचएफ-९० या जातीच्या गायीला लम्पी साथीच्या आजारासारखी प्राथमिक लक्षणे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. देशात लम्पी या रोगाने थैमान घातले असतानाच हातकणंगले तालुक्यातील ही पहिलीच घटना निदर्शनास आली आहे. आपले पशुधन कसे सांभाळायचे, या काळजीने शेतकर्‍यांला ग्रासले आहे. याबाबत खबरदारी घेत सर्व शेतकर्‍यांनी आपल्या… Continue reading कापूरवाडी येथे गायीला ‘लम्पी’ची लागण

नव्या स्टार्टअपना गुंतवणूकदार देण्यासाठी ‘सायटेक पार्क’चे सहकार्य

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतात नावीन्यपूर्ण योजना, कल्पना मांडणाऱ्या प्रतिभावान आणि कुशल तरुण उद्योजकांची कमतरता नाही; परंतु अनेकदा त्याना आर्थिक पाठबळ उपलब्ध होत नाही. अशा नव संकल्पना असलेल्या स्टार्टअपना १ कोटीपर्यंत गुंतवणूकदार उपलब्ध करून देण्यासाठी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे सहकार्य राहील, अशी ग्वाही सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे संचालक हार्दिक जोशी यांनी दिली. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी… Continue reading नव्या स्टार्टअपना गुंतवणूकदार देण्यासाठी ‘सायटेक पार्क’चे सहकार्य

टोप-संभापूरजवळ बस उलटून १ ठार, ६ जखमी

टोप (प्रतिनिधी) : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टोप-संभापूर येथील टोयाटो शोरूम समोरील सेवा रस्त्यावर भरधाव कर्नाटक बस उलटून झालेल्या अपघातात एक ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे टोप-संभापूर येथे झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बेळगावहून पुण्याकडे निघालेली कर्नाटक डेपोची बस (के.ए. ६३ एफ ०१३७) मध्यरात्री एकच्या सुमारास… Continue reading टोप-संभापूरजवळ बस उलटून १ ठार, ६ जखमी

टोप येथील देखावा स्पर्धेत गणेश, हनुमान तालीम प्रथम  

टोप (प्रतिनिधी) : गणेशोत्सवनिमित्त येथील ग्रा.पं. च्या वतीने आयोजित आकर्षक देखावा स्पर्धेमध्ये गणेश तालीम व हनुमान तालीम मंडळ यांना प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला. या देखावा स्पर्धेमध्ये १० मंडळांनी भाग घेतला होता. यासाठी गावाबाहेरील परीक्षक ग्रा.पं. ने नेमले होते. आज ग्रा.पं. च्या देखावा स्पर्धेचे विजेते जाहीर करण्यात आले. यामधील अन्य विजेते : व्दितीय- भगतसिंग ग्रुप,… Continue reading टोप येथील देखावा स्पर्धेत गणेश, हनुमान तालीम प्रथम  

नेत्रदान चळवळीला बळ मिळणे आवश्यक : पी. एम. पाटील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नेत्रदान चळवळीला बळ मिळणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. एम. पाटील यांनी व्यक्त केले. नेत्र जनजागृती पंधरवडा निमित्त ‘सक्षम’ (समदृष्टी, क्षमता विकास तथा अनुसंधान मंडल) शाखा कोल्हापूर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर यांच्यामार्फत आयोजित येथील जिल्हा न्यायालयात झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विवेकानंद नेत्र रुग्णालयाचे डॉ.… Continue reading नेत्रदान चळवळीला बळ मिळणे आवश्यक : पी. एम. पाटील

शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त

औरंगाबाद (प्रतिनिधी) : शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर १६ सदस्यांची नेमणूक विश्वस्त मंडळात करण्यात आली होती; मात्र हे विश्वस्त नियमाला धरून नसल्याने त्याचा आक्षेप याचिकाकर्ते उत्तमराव शेळके यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली होती. गेल्या अनेक… Continue reading शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचे विश्वस्त मंडळ बरखास्त

अनिल देशमुख यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ

मुंबई (प्रतिनिधी) :  माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात आज अनिल देशमुख यांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी अनिल देशमुख यांना २७ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. अनिल देशमुख हे दि. २९ ऑगस्ट रोजी चक्कर येऊन तुरूंगात… Continue reading अनिल देशमुख यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ

error: Content is protected !!