मजले येथील आशिष कोठावळे यांचा भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल पुरस्काराने सन्मान

0
58

हातकणंगले (प्रतिनिधी) : मजले (ता. हातकणंगले) येथील सामाजिक कार्यकर्ते आशिष कोठावळे यांना राष्ट्रीय स्तरावरील भारतरत्न मदर तेरेसा गोल्ड मेडल अॅवॉर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आशिष कोठावळे हे अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत आहेत. कोरोना काळातही त्यांनी विषेश योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी आशिष कोठावळे म्हणाले की, या पुरस्काराने आपल्याला सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करण्यास ऊर्जा मिळाल्याचे तसेच या पुरस्काराचे सर्व श्रेय माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्वच शिलेदारांना जाते असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेत्री विद्या करंजीकर, प्रसिद्ध कॅन्सरविकारतज्ञ डॉ.राज नगरकर, प्रसिद्ध मॉडेल कलाकार प्रिय सुरते, भारत विकास प्रबोधिनीचे विजय इंगळे, सेंट्रल बँक ऑफ़ इंडियाचे शाखाधिकारी अनिल कोठावळे, नागेश कोठावळे तसेच सर्व विभागातील पुरस्कारार्थी उपस्थित होते. आशिष कोठावळे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here