मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेसोबत झालेल्या वादंगानंतर अभिनेत्री कंगना राणावत अनेक दिवसांनी मुंबईत  दाखल झाली . त्यानंतर कंगनाने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. मला मुंबईत राहण्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नसून फक्त गणपती बाप्पाचा आशीर्वाद आणि परवानगी हवी आहे. ती मिळाली आहे. अजून कोणाकडे मी परवानगी मागितलेली नसल्याचे माध्यमांना सांगितले.

यावेळी तिच्यासोबत बहिण रंगोली, भाऊ आणि वहिनी होती.  यावेळी तिने ‘जय महाराष्ट्र’ अशी घोषणा देत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

दरम्यान, कंगनाने ट्विटरवर सिद्धिविनायक मंदिराबाहेरचे फोटो शेअर केले आहेत. यात तिने म्हटले आहे की,  माझ्या लाडक्या मुंबई शहरासाठी उभं राहिल्यानंतर शत्रुत्वाचं प्रमाण आश्चर्यचकित करणारे होते. आज मी मुंबादेवी आणि सिद्धिविनायक मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. मला सुरक्षित आणि स्वागत केल्यासारखे वाटत आहे.