पन्हाळा गडाशेजारील पावनगडावर सापडले तोफगोळे

1
5662

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पन्हाळा गडाशेजारील पावनगडावर ४०६ तोफगोळे सापडले आहेत. हे तोफगोळे शिवकालीन असल्याचा दावा करण्यात येत आहे. गडावरील दिशादर्शक फ़लक लावताना हे तोफगोळे सागडल्याची स्थानिकांनी माहिती दिली. पावनगड हा स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाधला आहे.

वनविभाग आणि टीम पावनगड ही संघटना गडावर दिशादर्शक फलक लावण्याचे काम करत आहेत. याचवेळी फलकासाठी खड्डा काढत असताना गडावरील महादेव मंदिराशेजारी हे गोळे सापडले. स्थानिकांच्या माहितीनुसार पूर्वीच्याकाळी याठिकाणी दारू गोळ्याचे कोठार होते.

1 COMMENT

  1. स्वराज्यकार्य टिम सकलपने मधुन टिम पावनगड गेली दोन वर्ष पावनगड वरती सवर्धनाचे कार्य करत आहेत आज दिनाक ०४/०२/२०२१ रोजी दिशा दर्शक फलक लावण्यासाठी खडा काढत असताना ३,४ तोफगोळे सापडले खडा अजुन खोदला असता त्या मधुण ३०० च्या वरती तोफगोळे सापडले, हा आई अंबाबाई ने टिमला दिलेला आशिर्वाद आहे⛳️🙏🏻
    *स्वराज्यकार्य टिम संकलपना कार्य हिच ओळख*⛳️🙏🏻

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here