इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीतील वस्त्रोद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या व पक्क्या मालाची आयात निर्यात करण्यासाठी हातकणंगले रेल्वे स्थानकावर गोदामची व्यवस्था करण्यात यावी, या मागणीचे निवेदन खा. धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली उद्योजक, व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज (शुक्रवार) कोल्हापुरात मध्य रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना सादर करण्यात आले.

कोल्हापूर जिल्ह्यातील रेल्वेचे विविध प्रश्न जाणून घेऊन प्रवाशांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी तसेच रेल्वे हेरिटेज करणेबाबत माहिती घेण्यासाठी संजीव मित्तल हे आज शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्या दरम्यान खासदार धैर्यशील माने यांनी रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

इचलकरंजी शहराबरोबरच ग्रामीण भागातील उद्योग व व्यापारासाठी कच्चा व पक्का मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. याठिकाणी कच्चा व पक्का माल ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध नसल्याने उद्योजक, व्यापारी व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे हातकणंगले रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी गोदामाची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून उद्योजक, व्यापाऱ्यांची चांगली सोय होऊन रेल्वेच्या महसुलात वाढ होणार आहे. त्यामुळे रेल्वे खात्याने तातडीने या ठिकाणी गोदामची व्यवसाय करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, या मागणीचे निवेदन उद्योजक, व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मित्तल यांच्याकडे सादर केले.

या शिष्टमंडळात सुभाष मालपाणी, श्यामसुंदर मर्दा,  सचिन भुते, अमोल कदम यांच्यासह उद्योजक व व्यापाऱ्यांचा समावेश होता.