दिंडनेर्लीतील अंगणवाडी सेविकेस मदतनीसाच्या पतीकडून मारहाण  

0
971

दिंडनेर्ली (प्रतिनिधी) : दिंडनेर्ली (ता. करवीर) येथील अंगणवाडी क्रमांक ६८ मधील सेविका गीता सुरेश वाडकर यांनी आपणास मदतनीस महिलेच्या पतीने अश्लील शिवीगाळ आणि चपलांनी मारहाण केल्याची फिर्याद इस्पुर्ली पोलीस ठाण्यामध्ये दिली. त्यानुसार अजित पांडुरंग कांबळे याला अटक करण्यात आली आहे.

दिंडनेर्ली येथील अंगणवाडी क्र. ६८ मध्ये गीता वाडकर आणि त्यांची सहकारी दीपाली अजित कांबळे एकत्र काम करतात. सोमवार दि. २३ रोजी वाडकर या गावातील लहान मुलांना व पालकांना पोषण कार्यक्रमास बोलावणेकरिता गेल्या होत्या. यावेळी अजित कांबळे याने आपली पत्नी रुपाली हिच्याऐवजी गीता वाडकर यांची अंगणवाडी सेविका म्हणून निवड झाल्याच्या रागातून आमच्या गल्लीतील मुले अंगणवाडीमध्ये न्यायची नाहीत असे सांगत वाडकर यांना अश्लील शिवीगाळ व चपलाने मारहाण केली. तसेच आणखी मारहाण करण्याची धमकी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here