अन्‌ ‘ईडी’च्या कार्यालयावर लागला ‘भाजप प्रदेश कार्यालया’चा बॅनर

0
135

मुंबई (प्रतिनिधी) : ईडीच्या नोटीशीवरून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच शिवसैनिकांनी मुंबईतील ईडीच्या कार्यालयावर भाजप प्रदेश कार्यालय असा बॅनर लावला आहे. या बॅनर्सचे फोटो  सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) रविवारी नोटीस पाठवली आहे. यावर संजय राऊत यांनी आज (सोमवार) पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर काही वेळातच मुंबईतील कार्यालयावर शिवसैनिकांनी बॅनर लावला. हा बॅनर लागल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली. मात्र, तुम्हाला हा बॅनर काढता येणार नाही. तुम्हाला हवं तर तुम्ही मुंबई महानगरपालिकेला तक्रार करा असे शिवसैनिकांनी पोलिसांना सांगितले. पण पोलिसांनी हा बॅनर काढून टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here