कोरोना प्रतिबंधक लसीवरून अखिलेश यादव यांनी तोडले तारे…

0
31

लखनौ (वृत्तसंस्था) : मागील वर्षी कोरोनामुळे देशात भयंकर परिस्थिती उद्भवली. लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकीकडे देशातील कोट्यवधी नागरिक कोरोना प्रतिबंधक लसीची प्रतीक्षा करत असताना समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अकलेचे तारे तोडले आहेत. मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपने तयार केलेल्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू ? असा सवाल त्यांनी केला आहे. यामुळे नवाच वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आपत्कालीन वापरासाठी काल परवानगी देण्यात आली आहे. इतरही लसी परवानगीच्या प्रतिक्षेत असून, केंद्र सरकारने लसीकरणासाठीची पूर्वतयारीही सुरू केली आहे. हे सगळं घडत असताना अखिलेश यादव यांनी खळबळजनक विधान केलंय. ते म्हणतात, मी सध्या लसीकरण करून घेणार नाही. भाजपच्या लसीवर मी कसा काय विश्वास ठेवू ? जेव्हा आमचे सरकार तयार होईल तेव्हा प्रत्येकाला मोफत लस मिळेल. आम्ही भाजपाची लस घेऊ शकत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here