नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने स्थगिती देत समिती स्थापन केली. दरम्यान या समितीतील मुख्य सदस्य भूपिंदर सिंह मान यांनी स्वतःहून माघार घेतली आहे. ते समितीमधून बाहेर पडले. मान हे भारतीय किसान संघटनेचे अध्यक्ष आहेत यापूर्वी त्यांनी या कायद्यांना समर्थन केले आहे.

त्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पंजाबसह भारतातील शेतकऱ्यांच्या हितासाठी मी कोणत्याही पदाचा त्याग करायला तयार आहे. मी पंजाब आणि शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणताही तोडगा निघत नसेल, तर मी स्वतः यातून माघार घेत आहे. याचबरोबर मी शेतकरी आणि पंजाबसोबत कायम राहणार आहे.