अभिनेत्री सागरिका घाटगे यांना पितृशोक

0
185

कोल्हापूर (प्रतिनिधी) : नागाळा पार्क येथील विजयसिंह यशवंतराव घाटगे-सरकार (कागलकर सिनियर) यांचे आज (शनिवार) दुपारी कोल्हापुरात निधन झाले. मृत्यूसमयी ते ६४ वर्षांचे होते. ते प्रसिद्ध अभिनेत्री सागरिका घाटगे यांचे वडील, विख्यात क्रिकेटपटू झहीर खान यांचे सासरे तर शाहू साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांचे चुलतबंधू होत.

मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी उर्मिला, मुलगा शिवजीत घाटगे, मुलगी, जावई असा परिवार आहे. रात्री उशिरा कसबा बावडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here