कोरोनासंसर्ग रोखण्यासाठी महापालिकेकडून कारवाईचा बडगा : दिवसात ३५ हजारांवर दंड वसूल

0
136

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिसांनी बेशिस्त वागणाऱ्यांवर कारवाईस सुरुवात केली आहे. आज १० दुकानांसह १८१ नागरिकांकडून ३५, १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोव्हज  वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केले.

यामध्ये दहा दुकानदारांकडून पाच हजार रुपये, थुंकणे, धूम्रपान केल्याबददल १० जणांकडून २००० रुपये, विनामास्क फिरणाऱ्यां १८१ नागरिकांकडून १८,१०० रुपये तर प्लॅस्टिक वापरल्याबददल दोन दुकानदारांकडून १० हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here