तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या ३८ जणांवर कारवाई

0
105

कोल्हापूर  (प्रतिनिधी ) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात ३८ जणांवर कारवाई करत ५ हजार ४०० रूपये दंड वसुली करण्यात आली. तंबाखू मुक्तीसाठी जनजागृती, प्रबोधन याबरोबरच दंडात्मक कारवाईही करावी. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांची मदत घ्यावी, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे यांनी  दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हास्तरीय समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. यावेळी ते बोलत होते.

गलंडे म्हणाले की, तंबाखूमुक्त तसेच थुंकीमुक्त मोहिमेसाठी प्रबोधन, जनजागृतीबरोबरच दंडात्मक कारवाईवर भर द्या. समाज माध्यमांचा प्रभावी वापर करावा. यासाठी स्थानिक पोलीसांची मदत घ्यावी.

प्रभारी जिल्हा सल्लागार चारुशीला कणसे म्हणाल्या की, कोटपा कायद्या २००३ च्या अंमलबजावणीकरिता पुढील महिन्यात अधिकारी,  मुख्याध्यापक, शिक्षक यांची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध ठिकाणी धाडी घालण्यात येणार आहेत. तंबाखूमुक्त शाळा अभियानांतर्गत शाळेपासून १०० यार्ड परिसरात पिवळ्या रंगाचा पट्टा आखण्यात येणार आहे.

डॉ. प्रल्हाद देवकर यांनी स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here