निकृष्ट अन्नधान्य वितरीत करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कारवाई

0
23
Rice

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई, ठाणेसह राज्याच्या विविध जिल्ह्यांतून रेशन दुकानदार निकृष्ट धान्यवाटप करीत असल्याच्या तक्रारी येत आहेत. असे करणाऱ्या दुकानदारांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

नियमानुसार धान्य वितरण न करणे, पावत्या न देणे, निकृष्ट धान्य वाटप करणे अशा तक्रारी येत आहेत. यासंबंधीच्या बातम्याही वृत्तपत्रातून प्रसिध्द होत आहेत. याची दखल मंत्री मुश्रीफ यांनी घेतली आहे. कोणत्याही अधिकृत शिधावाटप दुकानांतून निकृष्ट दर्जाचे अन्न वितरीत करण्याचा प्रयत्न झाल्यास कार्यालयाच्या हेल्पलाईन क्रमांक ०२२- २२८५२८१४ तसेच ई-मेल आयडी dycor.ho-mum@gov.in यावर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here