हातकणंगले (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील आळते येथील केंद्र शाळेला पंचायत समिती सदस्य प्रविण जनगोंडा यांनी अचानक भेट दिली. त्यावेळेस शाळेमध्ये एकही शिक्षक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यावेळेस शाळेत फक्त एक मदतनीसच सर्व कामे करत  असल्याचे दिसून आले. याबाबतची चौकशी करणार असल्याचे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रविण यादव यांनी सांगितले.

आळते केंद्र शाळेला पं. स. सदस्य प्रविण जनगोंडा यांनी अचानक भेट दिली असता शाळेत एकही शिक्षक हजर नसल्याचे दिसून आले. याबाबत याची माहिती त्यांनी जि.प. शिक्षण विभागाला दिली. जि. प. चे शिक्षण सभापती प्रविण यादव यांनी याची दखल घेऊन आज (शुक्रवार) या केंद्र शाळेला भेट देऊन झालेल्या प्रकाराची माहिती घेतली. आणि याबाबत खातेनिहाय चौकशी करणार असल्याचे सांगितले.