मुंबई (प्रतिनिधी) : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अयोध्या राम मंदिराचा प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मार्गी लागला. मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी पार पाडले. या मंदिराचे आता काम देखील सुरु झाले आहे. पण असे असताना आता मंदिर बांधणीमध्ये एक अडथळा समोर आला आहे.

राम मंदिराचा पाया असलेल्या जमिनीखाली वाळूमिश्रीत माती सापडली आहे. ही माती मंदिर निर्मितीसाठी योग्य नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. हे भव्य मंदिर अनेक मोठ्या दगडांना आकार देऊन उभारले जाणार आहे. त्यामुळे या दगडांना पेलू शकेल अशी माती मंदिराच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. या बांधकामाची चाचणी करत असताना दगड अचानक खाली घसरला. त्यानंतर केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली.