पंढरपूर  (प्रतिनिधी) : पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना २० जानेवारीपासून ऑनलाइन पासशिवाय श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज (सोमवार) येथे सांगितले.   श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक भक्त निवास येथे घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

या बैठकीत भाविकांना विठ्ठलाचे दर्शन उपलब्ध करून देताना करावयाच्या उपाययोजना यावर चर्चा करण्यात आली. १२ जानेवारीपासून रोज ८ हजार भाविकांना विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेता येईल. त्यानंतर २० जानेवारीपासून मंदिरात सर्वांना प्रवेश मिळेल. मात्र, कोरानाबाबतची सर्व नियमावलीची अंमलबजावणी  करण्यात येणार आहे. तसेच लहान मुले, ६५ वर्षापुढील लोक व गर्भवती महिलांना मंदिरात प्रवेश करता येणार नाही. त्याचबरोबर भाविकांना ओळखपत्राची आवश्कता बंधनकारक असेल. तसेच पूर्वीप्रमाणे ऑनलाइन पास बुकिंग करून देखील भाविक त्यांच्या वेळेनुसार दर्शनासाठी येऊ शकतात, असे  गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.