News Flash

लाईव्ह मराठीचा दणका : गडहिंग्लज-आजरा रोडवरील ट्रॅव्हल्स पार्किंग जागेत बदल

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज येथील आजरा रोडवर ट्रॅव्हल्स उभ्या राहायच्या. त्यामुळे आजरा रोडवर वाहतूक समस्या आणि अपघात होत होते. ‘लाईव्ह मराठी’ने याबाबत आवाज उठवून वृत्त प्रसिद्ध केले. यानंतर पोलीस प्रशासनाला जाग आली. गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक व्ही. व्ही. हसबनीस यांनी सर्व ट्रॅव्हल्स बसमालकांची बैठक बोलावली. आपल्या बसेस कडगाव रोड़नजीक रेस्ट हाउसजवळ उभा करण्याच्या सूचना दिल्या. ट्रॅव्हल्स बसमालकांनी सोमवार दि. ५ पासून बसेस त्या ठिकाणी उभा करण्याचे मान्य केले. त्यामुळे आजरा रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानदाराकडून या निर्णयाचे कौतुक होत आहे.
गडहिंग्लज-आजरा रस्ता हा राज्य मार्ग म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावर सर्वाधिक वाहनाची वर्दळ असते. तेथे ट्रॅव्हल्स बसेस उभ्या केल्या जात असल्यामुळे वाहतूक विस्कळीत होऊन अपघात होऊ लागले. त्यामुळे या बसेस येथून हलवणे गरजेचे होते. याबाबत लाईव्ह मराठीने आवाज उठवीत वृत्त प्रसिद्ध केले होते.
यानंतर पो. नि. हसबनीस यांनी गुरुवार ता. १ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता सर्व ट्रॅव्हल्स बसेस मालकांची बैठक बोलावली. आजरा रस्त्यावर पार्किंग केल्या जाणाऱ्या बसेसमुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे आपल्या बसेस कडगाव रस्त्यावरील रेस्ट हाउसजवळ सोमवारपासून उभ्या कराव्यात, अशी सूचना केली. बसेस मालकांनीही ते मान्य केले. त्यामुळे आजरा रोडवरील रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या दुकानदाराकडून या निर्णयाचे कौतुक होत आहे. रविवार भरणाऱ्या आठवडा बाजारादिवशी वाहतूक नियोजन उत्तम प्रकारे हाताळल्यानंतर पोलीस प्रशासन शहरातील मोठ्या रस्त्यावरील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न करीत आहे. सर्वच रस्त्यांवरील कोंडी दूर करण्याचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही हसबनीस यांनी दिली.

One thought on “लाईव्ह मराठीचा दणका : गडहिंग्लज-आजरा रोडवरील ट्रॅव्हल्स पार्किंग जागेत बदल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे