गडहिंग्लजचे आराध्यदैवत काळभैरी मंदिरात चोरी : भाविकांमध्ये खळबळ

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लजचे आराध्यदैवत श्री काळभैरी देवाच्या मंदिरामध्ये काल (गुरुवार) मध्यरात्री चोरी झाली आहे. मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून हि चोरी केली आहे. यावेळी अंदाजे १० ते १२ किलो चांदीचे दागिने आणि सोन्याचे २ मंगळसूत्र आणि देणगी पेट्या असा लाखोंचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. मंदिराच्या सी.सी.टी.व्ही. मध्ये हा प्रकार रेकार्ड झाला असून ३ चोरटे असल्याचे समजते. चोरीच्या या घटनेमुळे गडहिंग्लज परिसरात एकच खळबळ माजली आहे. भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचे पुजारी संजय गुरव आज पहाटे साडेपाच ते ६ च्या सुमारास नेहमीप्रमाणे पूजेसाठी मंदिरात गेले. त्यावेळी त्यांना देवळाचा दरवाजाचे कुलूप तोडल्याचे आढळून आले. त्यांनी आत मंदिरात पहिले असता त्यांना हा चोरीचा प्रकार लक्षात आला. यावेळी त्यांनी ताबडतोब हा प्रकार पोलिसांना कळवला. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मंदिरातील देवाचे चांदीचे दागिने किरीट, कुंडल, पादुका, राजदंड, शेषनाग, मूर्तीमागील चांदीची प्रभावळ यासह जोगेश्वरी देवीच्या अंगावरील मंगळसूत्र असा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. मंदीरामध्ये असणाऱ्या सी.सी.टी.व्हीमध्ये हा सर्व प्रकार रेकार्ड झाला असून ३ तरुण चोरट्यांनी हि चोरी केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून श्वान पथक आणि ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

देश-विदेश

 

क्रीडा

गुन्हे