Breaking News

 

 

यशवंत पंचायत राज अभियानात कोल्हापूर जिल्हा परिषद प्रथम…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : यशवंत पंचायत राज अभियानात सन २०१८-१९ अतंर्गत कोल्हापूर जिल्हा परिषदेने विभागात प्रथम क्रमांक मिळवला. जि.प.ने आपल्या विविध विभागाकडील योजनांची स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक आणि भौतिक साधनांच्या आधारे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला होता. या प्रस्तावांच्या गुणांकनानुसार कोल्हापूर जिल्हा परिषद ही पुणे विभागामध्ये पाच जिल्हयांमध्ये प्रथम आली.

विभागीय आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बग़ाडे यांच्या समितीने जि.प. कोल्हापूरची तपासणी केली होती. यासाठी जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सर्जेराव पाटील, डॉ. रवी  शिवदास, अजयकुमार माने, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ, जि.प. सदस्य, अधिकारी, कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेने हे यश संपादन केले.

यानंतर जिल्हा परिषदेची राज्यस्तरीय मुल्यांकनासाठी विभागामधुन निवड झाल्याने लवकरच राज्यस्तरीय समिती पडताळणीसाठी येणार आहे. तसेच पंचायत समितीने स्वयं मुल्यमापनाद्वारे आर्थिक व भौतिक साधनांच्या आधारे प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. त्यानुसार विभागीय स्तरावरील निवड समिती मार्फत पंचायत समिती, गडहिंग्लजची तपासणी केली होती. समितीने केलेल्या तपासणी व पडताळणीमध्ये विभागस्तरावर पंचायत समिती, गडहिंग्लजने द्वितीय क्रमांक पटकविला आहे. यासाठी पंचायत समिती सभापती व गट विकास अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पंचायत समितीने हे यश संपादन केले आहे. 

309 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग