Breaking News

 

 

बिल नाही तर पैसे देऊ नका ! : रेल्वेने जारी केली नियमावली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वेत खाद्यपदार्थ घेतल्यानंतर कोणत्याही विक्रेत्यांकडून बिल मिळाले नाही तर खरेदी केलेल्या वस्तू मोफत मिळतील, असा नियम रेल्वेने अमलात आणला आहे. विक्रेत्यांनी ग्राहकांना बिल देणे बंधनकारक आहे. रेल्वे किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर जर एखादा विक्रेता आपल्याला बिल देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही त्याला पैसे देण्याची गरज नाही. रेल्वेकडून No Bill, No Payment ही योजना आणली असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत स्पष्ट करीत एक व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे.

अनेकवेळा रेल्वे प्लॅटफॉर्म किंवा रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ किंवा एखादी वस्तू खरेदी केली तर त्याची बिलाची पावती विक्रेत्यांकडून मिळत नाही. मात्र, आता रेल्वे प्रशासनाकडून गुरुवारपासून नवीन नियम लागू करण्यात आला आहे. त्यानुसार, रेल्वे स्टेशन आणि रेल्वेत खाद्यपदार्थ घेतल्यानंतर कोणत्याही विक्रेत्यांकडून बिल मिळाले नाही तर खरेदी केलेल्या वस्तू मोफत मिळतील. रेल्वे किंवा रेल्वे प्लॅटफॉर्मवर जर एखादा विक्रेता आपल्याला बिल देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही त्याला पैसे देण्याची गरज नाही.

1,014 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग