Breaking News

 

 

समरजीतसिंह घाटगेंंसमोर चंद्रकांतदादांची मुश्रीफांना खुली ‘ऑफर’

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चंद्रकांत पाटील प्रथमच कोल्हापूरला आले आहेत. आज गडहिंग्लज येथील कार्यक्रमात दादांनी आ. हसन मुश्रीफ यांचे कौतुक करून त्यांना समरजीतसिंह घाटगे यांच्यासमोरच भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली. दादांनी नुकतेच आघाडीचे १० आमदार भाजप प्रवेश करणार असल्याचे बोलले होते त्यात मुश्रीफ यांचे नाव नाही. पण, ते ११ वे ठरले तर जास्त आनंद होईल असेही त्यांनी बोलून दाखवले.

(जाहिरात – रोगनिदान क्षेत्रात गेल्या २५ वर्षापासून अग्रेसर असणारे अॅपल हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिटयुट लि. सादर करत आहे एक अभिनव योजना. योजने अंतर्गत एमआरआय  तपासणी अत्यंत कमी खर्चात मणका, मेंदू, गुडघा, इतर सांधे व पोटाच्या MRI बिलावर भरघोस सूट (लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी)

योजना कालावधी २० जून ते २० आॅगस्ट २०१९

या योजनेचा लाभ घेण्यासाठी 📲संपर्क करा

फोन : 📞०२३१-२६५७१७१, 📲९८२२७८७९३१ / ९३७००७५७२८📲)

आज गडहिंग्लज येथील कार्यक्रमात मंत्री चंद्रकांतदादा पाटील , आ. हसन मुश्रीफ, आ. संध्यादेवी कुपेकर, म्हाडाचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे आदी सर्वच नेते एका व्यासपीठावर आले होते. प्रथम आ. मुश्रीफ यांनी, ‘दादांंचं नशीब फळफळलंय. पाच वर्षात त्यांना जे काही मिळालं आहे ते नशीबवानालाच मिळते. त्यांच्या कुंडलीत राहू-केतूच नाहीत’ असे म्हटल्यावर एकच हशा पिकला. याचबरोबर आपल्या भाषणामध्ये समरजीतसिंह घाटगे याचं उल्लेख त्यांनी इच्छुक आमदार असा करून ‘दादांनी काल जे १० आमदार सांगीतले आहेत त्यात मी नाही हं’ असेही मुश्रीफ यावेळी स्पष्ट केले.

यानंतर चंद्रकांतदादा मुश्रीफ यांच्या बोलण्याचा धागा पकडून म्हणाले, १० आमदारांमध्ये मुश्रीफ नाहीत पण ते ११ वे म्हणून आले तरी आम्हाला आनंद होईल. सह्र्दयी आमदार म्हणून मुश्रीफ यांच्याकडे पाहिलं जातंं. त्यांच्यासारखा माणूस आमच्याकडे पाहिजे. तुम्ही आला तर तुमचं स्वागतच आहे. असे सांगत त्यांना खुली ऑफर दिली.

मंत्री चंद्रकांतदादा आणि आ. मुश्रीफ यांच्या या टोलेबाजीमुळे गडहिंग्लज कार्यक्रम लक्षवेधी ठरला हे निश्चित. पण दादांच्या खुल्या ऑफरमुळे दुसरीकडे कागलमध्ये मात्र राजकीय चर्चेला उधाण येणार हे पण तितकेच खरे आहे. स्वत दादांनीच मुश्रीफ यांचे कौतुक केल्यामुळे कागलमध्ये भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

14,881 total views, 27 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग