Breaking News

 

 

‘सोनभद्र’ला जाणाऱ्या प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात…

लखनौ (वृत्तसंस्था) : आम्ही भाजपाच्या दबावापुढे झुकणार नाही. सोनभद्रमध्ये जे लोक मारले गेले त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मी आले आहे, पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यात गैर काय, असा सवाल काँग्रेसच्या उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला. प्रियंका गांधी या सोनभद्र या ठिकाणी पीडितांची भेट घेण्यासाठी गेलेल्या असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. गांधी यांना अटक करण्यात आलेलं नाही तर त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं डीजीपींनी सांगितलं आहे.

(जाहिरात –  आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

 अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

 २५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

 ४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

पत्ता –: खंडोबा मंदिरासमोरशिवाजी पेठकोल्हापूर.  फोन – (०२३१) २६२७५७९)

उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे गुरुवारी जमिनीच्या वादातून १० गोंड आदिवासींची भू माफियांनी हत्या केली, तर काही जण जखमी झाले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस करण्यासाठी प्रियांका गांधी सोनभद्र येथे जात होत्या. या वेळी त्यांना नारायणपूर पोलीस ठाण्याजवळ पोलिसांनी अडवले आणि ताब्यात घेतले. यामुळे प्रियांका गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

भाजपाच्या राज्यात झुंडशाही आणि गुंडगिरी वाढली आहे असा आरोप करीत मला अटक करण्यात आली आहे, त्याचे कारण समजलेले नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही झुकणार नाही. मी हिंसाचारात बळी गेलेल्या पीडितांना भेटण्यासाठी आले आहे. बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना भेटणे, त्यांची विचारपूस करणे गैर आहे का, असा सवाल त्यांनी केला.

372 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग