Breaking News

 

 

‘आयसीसी’कडून झिम्बाब्वे क्रिकेट मंडळासह संघावर बंदी…

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : झिम्बाब्वे क्रिकेट संघावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बंदी घातली आहे. त्यामुळे या संघाला आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत भाग घेता येणार नाही. त्याचप्रमाणे लोकशाही पद्धतीने निष्पक्ष निवडणूक न झाल्याने आणि क्रिकेट प्रशासनात राजकारण घुसल्याने झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डही निलंबित करण्यात आले आहे.

आयसीसीच्या वार्षिक बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. खेळाला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त ठेवले पाहिजे. कोणत्याही सदस्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय गंभीर आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आयसीसीच्या घटनेचे उल्लंघन केले आहे. ते अनियंत्रित पद्धतीने कायम ठेवण्याची परवानगी आम्ही देऊ शकत नाही, असे आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी सांगितले. 

या कारवाईमुळे आयसीसीकडून कोणताही निधी मिळणार नाही. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत झिम्बाब्वे क्रिकेट संघाला सहभागी होता येणार नाही. हा झिम्बाब्वेला मोठा झटका मानला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग