Breaking News

 

 

इराणचा ड्रोन पाडल्याचा अमेरीकेचा दावा…

वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) : खाडी क्षेत्रात अमेरिकेच्या नौसेनेने इराणचे ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. काही आठवड्यांपूर्वीच इराणने अमेरिकेचे ड्रोन पाडले होते. यावरून अमेरिकेच्या अध्यक्षांनी इराणवर हल्ल्याचा आदेशही दिला होता. मात्र, लगेगच हा आदेश मागे घेण्यात आला होता. तर अमेरिकेने ड्रोन पाडल्याच्या आरोपाचे इराणने खंडन केले आहे. 

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मूज खाडीमध्ये प्रवेश करणाऱ्या अमेरिकेच्या युद्धनौकेला धोका निर्माण झाला होता. यामुळे इराणचे ड्रोन पाडण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात शांत झालेल्या खाडी क्षेत्रामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. असॉल्ट युद्धनौका युएसएस बॉक्सरने इराणी ड्रोनविरोधात संरक्षणात्मक भूमिका घेतली. कारण हे ड्रोन विमान युद्धनौका आणि त्यावरील सैनिकांना आव्हान देत होते.  हे ड्रोन एक हजार यार्डाच्या आत येताच पाडण्य़ात आल्याचे सांगितले.

तर इराणने, आपल्याकडे अद्याप ड्रोन पाडल्याची माहिती आलेली नसल्याचे इराणचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी मोहम्मद जरीफ यांनी पत्रकारांना सांगितले. ते युएनच्या मुख्यालयामध्ये महासचिवांशी चर्चा करण्यासाठी आले आहेत.

300 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग