Breaking News

 

 

वाघवेत सर्पदंशाने महिलेचा मृत्यू…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  वाघवे (ता. पन्हाळा) येथील कांचन दत्तात्रय सातपुते (वय ४२) या महिलेचा आज (गुरुवार) सर्पदंशाने मृत्यू झाला. आज सकाळी आठच्या सुमारास शेतात काम करीत असताना त्यांना डाव्या पायाला सर्पाने दंश केला. त्यांना  तातडीने कोल्हापूरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

222 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग