Breaking News

 

 

हुनगिनहाळ येथील युवकाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हुनगिनहाळ (ता. गडहिंग्लज) येथील युवकाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. विशाल चंद्रकांत यळगुडे (वय २६) असे त्याचे नाव असून हा प्रकार आज (गुरुवार) सकाळी हरळी खुर्द येथे घडला.

यळगुडे परिवाराचे हुनगिनहाळ येथे तारा फॅब्रिकेशन नावाचे दुकान आहे. विशाल आणि त्याचे वडील चंद्रकांत हे हा व्यवसाय करीत असतात. आज सकाळी हरळी खुर्द येथे काम चालू असताना विशालला विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. आयटीआयचे शिक्षण पूर्ण करून तो वडिलांना व्यवसायामध्ये मदत करीत होता. त्याच्या अचानक मृत्यूने  गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गडहिंग्लज पोलीस अधिक तपास करीत आहेत.

1,284 total views, 12 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग