Breaking News

 

 

‘मायावतीं’च्या भावावर आयकर विभागाची मोठी कारवाई

लखनऊ (वृत्तसंस्था) : बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती यांचा भाऊ आनंद कुमार यांच्या बेहिशोबी संपत्तीवर आयकर विभागाने आज (गुरुवार) कारवाई केली. उत्तर प्रदेशातील सधन भाग नोएडा येथील ४०० कोटी रुपये किंमतीची सात एकरची जमीन आयकर विभागाने जप्त केली आहे.

( जाहिरात – 👉🏼  नर्सरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी 🔝  परफेक्ट डेस्टिनेशन

चाटे शिक्षण समूह

 ‘लाईव्ह मराठी’च्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास ५ टक्के सूट

प्रवेशासाठी संपर्क – ९३२६६१४४४० / ९३७१६११४८५)

राष्ट्रीय उपाध्यक्ष आनंद कुमार यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात येत होती. याच दरम्यान त्यांच्याकडे एक बेहिशोबी जमीन असल्याचे आयकर विभागाला समजले होते. ज्यानंतर त्यांनी छापा मारून ही कारवाई केली. आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचित्रलता या दोघांची ही जमीन असल्याचे पुढे आले आहे. ही बेहिशोबी जमीन जप्त करण्याचे आदेश १६ जुलै रोजी देण्यात आले होते. त्यानुसार आयकर विभागाने ही कारवाई केली. 

आनंदकुमार यांच्या नावे आणखी बेहिशोबी संपत्ती असल्याचे सांगण्यात येत आहे. याची माहितीही आयकर विभागाला मिळाली आहे. या संपत्तीवर जप्ती येण्याची शक्यता आहे. आयकर विभागासोबतच ईडीकडूनही या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. 

339 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग