Breaking News

 

 

या आठवड्यात ‘ही’ मालिका ठरली ‘नंबर वन’

मुंबई (प्रतिनिधी) : झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील गुरुचे होणारे हाल आणि शनाया, राधिकानं या केविलवाण्या गुरुकडे फिरवलेली पाठ प्रेक्षकांना अधिक पसंती पडत आहे. या सिनमुळे मालिकेचा टीआरपी मागील आठवड्याच्या नंबर वनप्रमाणेच या आठवड्यातही तसाच कायम ठेवत स्थान अबाधित ठेवले आहे.

(जाहिरात – ✍🏼  आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

  अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

  २५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

  ४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

  पत्ता –: खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर.  फोन – (०२३१) २६२७५७९)

झी मराठीच्या मालिकेंचे वर्चस्व ठेवत दुसऱ्या स्थानावर ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेने आपले स्थान निर्माण केले आहे. यात राणादाचं बदलेलं रूप प्रेक्षकांना आवड आहे. त्यामुळे राणादाबरोबर मालिकेचाही मेकओव्हर होतो आहे. डॉ.अमोल कोल्हेंनी साकारलेले संभाजी महाराज तर लाजवाब, पण कारभारी असोत, येसूबाई असो, सोयरा मातोश्री असो.. अशा उठावदार भूमिकांमुळे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका तिसऱ्या स्थानावर आहे. या आठवड्यात प्रेक्षकांचा निरोप घेणारा ‘तुला पाहते रे’ चौथ्या नंबर आहे.

झी मराठीबरोबर कलर्स मराठीनेही आपले स्थान राखले आहे. ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेने पाचवे स्थान मिळविले आहे. प्रत्येकवेळी टीआरपी चार्टमध्ये फक्त झी मराठीच दिसत असते. पण यावेळी बदल झाला आहे. पाचव्या नंबरवर कलर्स मराठीनं स्थान पटकावलं. पण अजून बिग बाॅस मराठी, रात्रीस खेळ चाले मालिका अजून पहिल्या पाचचा स्थानात आले नाहीत.

759 total views, 9 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग