Breaking News

 

 

बीसीसीआयकडून विराटला मोठा धक्का

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून यावेळीची कोच आणि सपोर्ट स्टाफची निवड गेल्यावेळी सारखी असणार नाही. नवा कोच कोण असणार याची चर्चा सुरू असताना बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. कोच निवडीच्या प्रक्रियेतून विराटला बाजूला करण्यात आले आहे. याचाच अर्थ यंदा नवा कोच निवडताना विराटची पसंद किंवा नापसंद विचारत घेतली जाणार नाही.

(जाहिरात – ✍🏼  आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी

  अरुण नरके फौंडेशन स्पर्धा मार्गदर्शन केंद्र

  २५ वर्षांचा अनुभव असणारी विश्वसनीय संस्था

  ४००० हून अधिक विद्यार्थी शासकीय व बँकिंग सेवेत

  पत्ता –: खंडोबा मंदिरासमोर, शिवाजी पेठ, कोल्हापूर.  फोन – (०२३१) २६२७५७९)

कोच निवडी संदर्भात मिळालेल्या वृत्तानुसार, नव्या कोच निवडीसंदर्भात विराटचे मत विचारात घेतले जाणार नाही. गेल्यावेळी म्हणजेच २००७मध्ये जेव्हा रवी शास्री यांची कोच म्हणून निवड करण्यात आली होती. तेव्हा विराटचे मत विचारात घेण्यात आले होते. यावेळी कोचसंदर्भातील अंतिम निर्णय माजी क्रिकेटपटू कपिल देव घेतील. त्यानंतर प्रशासकिय समिती यावर शिक्कामोर्तब करेल.

२०१७मध्ये जेव्हा कोच असलेले अनिल कुंबळे यांचा कालावधी वाढवण्यात आला नव्हता. तेव्हा देखील विराट कोहलीचे मत विचारात घेतले होते. इतक नव्हे तर विराटच्या म्हणण्यानुसारच कुंबळे यांना पदावरून हटवण्यात आले होते. कोहलीने कुंबळेसोबत काम करण्यास हरकत घेतली होती.

1,593 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग