Breaking News

 

 

शहरात ‘७७’ हजार रुपयांच्या बनावट ‘दारु’सह कार-मोपेड जप्त…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले रुग्णालयानजीक गोवा बनावटीच्या मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या सईद अहमद अब्दुला गडवाले आणि अज्ञात मोपेड चालकाकडून ७७ हजार रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू, एक कार आणि मोपेड असा एकूण २ लाख ३७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई लक्ष्मीपुरी पोलीसांनी आज (बुधवार) केली.

लक्ष्मीपुरी पोलिसांना घिसाड गल्लीत राहणाऱ्या सईद अहमद अब्दुला गडवाले हा बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सुभाष रोडवर लक्ष्मीपुरी पोलीसांनी पाळत ठेऊन व्होडाफोन केअर सेंटर जवळ संशयित गडवाले आणि त्याचा साथीदार मोटारीतून आणि मोपेडवरुन जात असताना पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाडी न थांबवता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान दोघांनीही घटनास्थळी गाडी टाकून पळ काढला. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीतून ७७ हजार रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू मिळून आली. तर याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या  गुन्ह्यातील आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

501 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग